आपला जिल्हाक्रीडाताज्या घडामोडीनिपाणी परिसरशैक्षणिक

‘करिअर इन फिल्म इंडस्ट्री'(Career In Film Industry) या एकदिवसीय चर्चासत्राचे देवचंद महाविद्यालयात आयोजन!

व्याख्याते म्हणून अनुप जत्राटकर व डॉ चंद्रकांत डावरे यांची विशेष उपस्थिती!

Kiran G.Patil M.No.8884357516


‘युवकांनी स्वतःमधील गुण कोणते आहेत हे स्वतः ओळखले पाहिजे आणि आपणाला आवडणाऱ्या क्षेत्रांमध्ये भाग घेतला पाहिजे .प्रामाणिकपणा व जिद्द असेल तर आपणाला फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक संधी उपलब्ध होतात ‘, असे प्रतिपादन श्री अनुप जत्राटकर यांनी व्यक्त केले. तर जीवनामध्ये सकारात्मकतेची गरज ओळखली तर जीवनाचा आनंद घेता येतो असे प्रतिपादन डॉ चंद्रकांत डावरे यांनी व्यक्त केले . देवचंद कॉलेजमधील इतिहास विभागामार्फत आयोजित ‘करिअर इन फिल्म इंडस्ट्री ‘ या एकदिवसीय चर्चासत्राचे ते प्रमुख व्याख्याते होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉलेजच्या प्राचार्या प्रो.डॉ.जी डी इंगळे होत्या. पहिल्या सत्रात बोलताना ते म्हणाले ‘डिस्कवरी चॅनल , नॅशनल जिओग्राफिक चॅनल , ऍनिमल प्लॅनेट यामध्ये इतिहासाच्या विद्यार्थ्यांना संशोधक म्हणून आपले करिअर घडवू शकतात. त्याचप्रमाणे मेकअप आर्टिस्ट , कॉस्च्युम रिसर्च यामध्ये देखील ते आपले करिअर घडवू शकतात. फिल्म सिटी मध्ये एकूण 164 विभागांमध्ये 64 प्रकारच्या कला आहेत त्या प्रत्येक क्षेत्रात युवकांना करियर घडविण्याची संधी आहे.

दुसरा सत्रामध्ये बोलताना श्री चंद्रकांत डावरे म्हणाले की फिल्म सिटी मध्ये करिअर करत असताना युवकांनी एकाग्रता व अनुभव आत्मसात करून उज्वल भविष्य घडवू शकता तसेच तुम्ही स्वतः मधील गुण ओळखून व्हॉइस आर्टिस्ट होऊ शकता .

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांची ओळख इतिहास विभाग प्रमुख डॉ. सी एम नाईक यांनी केले तर आभार डॉ. ए.बी.नाडगौडा यांनी मानले .सदरच्या कार्यक्रमास, डॉ. सिकंदर शिदलाळे व श्री रमेश कुंभार हे उपस्थित होते .कार्यक्रम यशस्वी करण्यास संस्थेचे अध्यक्ष  आशिषभाई शाह व डॉ. सौ तृप्तीभाभी शाह यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!