आपला जिल्हाताज्या घडामोडीनिपाणी परिसरराजकीयशैक्षणिक

यूपीआय (UPI) पेमेंट चे नियम बदलले 1 जानेवारी 2024 पासून!

सर्व व्यवहार करताना खालील बदल लक्षात घेणे गरजेचे!

Kiran G. Patil M.No.8884357516


केंद्र सरकारने चालू केलेल्या डिजिटल भारत संकल्पे मध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात अमुलाग्र बदल घडत असल्याचे आपण नित्य नियमाने पाहतो. पण काही पूर्वी डिजिटल इंडिया च्या माध्यमातून प्रस्तुत केलेले ॲप नव्याने सूचना मागवुन पूर्वीपेक्षा परिणामकारक करण्याच्या दृष्टीने आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचे ॲप म्हणजेच यूपीआय ॲप यामध्ये एक जानेवारी 2024 पासून अमुलाग्र बदल झालेले असून सर्व सुजाण नागरिकांनी यूपीआय ॲप वापरताना खालील गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे आहे.आपल्या देशात जवळपास 30 ते 40 कोटींच्या घरात यूपीआय युजर्स आहेत मंडई मार्केट पासून फाइव स्टार हॉटेल पर्यंत सगळीकडेच आपण मोबाईल  वरून पेमेंट करतो त्यामुळे खिशात पैसे ठेवायची सवय इतिहास जमा झाली आहे. 1 जानेवारी 2023  ते 31 डिसेंबर 23 मध्ये यूपीआय वापरून सोळा लाख कोटीपेक्षा जास्त व्यवहार झाले आहेत. पण यासोबत आजकाल यूपीआय पेमेंटच्या माध्यमातून फसवणूक करण्याचे प्रमाण सुद्धा वाढलेले आहेत. ते कंट्रोल करण्यासाठी सर्व ॲप मध्ये अनेक बदल केले जाणार आहेत. सर्व प्रकारच्या यूपीआय पेमेंट सिस्टीम मध्ये एक जानेवारी 2024 पासून लिमिट कमी करण्यापासून ते ॲप ॲप बंद करण्यापर्यंत कोणते बदल केले ते आपण पाहुयात

पहिला नियम असा की 2023 मध्ये तुम्ही न वापरलेले सर्व युपीआय ॲप्स लॉक होतील हा नियम असा की जर गुगल पे, फोन पे, पेटीएम, अमेझॉन पे, भिम यापैकी कोणताही ॲप तुमच्या फोनमध्ये असेल आणि संपूर्ण वर्षात तुम्ही एकदाही याचा वापर केला नसेल तर तो सिक्युरिटी रीजन साठी आरबीआय द्वारा रद्द केला जाणार आहे.

दुसरा आहे डेली पेमेंट लिमिट यूपीआय पेमेंट वर आता लिमिटेशन लावण्यात येणार आहेत. पेमेंट लिमिट हे आता कमी केलं जाणार आहे. एका दिवसामध्ये  फक्त एक लाखांपर्यंत कोणताही व्यवहार तुम्ही आता यूपीआय वापरून करू शकणार आहात.

तिसरा आहे स्पेशल पेमेंट लिमिट स्पेशल पेमेंट लिमिट हे पाच लाखांपर्यंत केलं जाणारे स्पेशल पेमेंट म्हणजे शाळा कॉलेज हॉस्पिटल मधली फी तिथले बिल्स हे सर्व व्यवहार इथले पेमेंट तुम्ही एक दिवसात पाच लाखांपर्यंत करू शकता.

चौथा आहे ट्रांजेक्शन सेटलमेंट खूप महत्त्वाचा बदल असणारा आहे . सायबर गुन्हा लक्षात घेऊन ते रोखण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा बदल केलाय.1 जानेवारी 2024 पासून 2000 पेक्षा जास्त रकमेचे व्यवहार पूर्ण होण्यासाठी चार तास लागणार आहेत. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी हे की जर तुम्ही कोणाशीही नेहमी व्यवहार करत असाल तर हा नियम तुमच्यासाठी लागू होणार नाही.

आता कोणालाही आपण पेमेंट करताना यूपीआय अँप मध्ये त्या व्यक्तीचे नाव बँकेचे नाव दिसणार आणि डिटेल्स मध्ये असलेलं खरं नाव योग्य वाटत नसेल तर आपण पेमेंट थांबवु शकतो.

एक जानेवारी पूर्वी कोणतेही पेमेंट करताना आपल्या बँक खात्यामध्ये पैसे असणे महत्त्वाचं होतं  पण आता 2024 पासून तुम्ही बँकेला लेखी विनंती करून यूपीआय पेमेंट करू शकता ही सर्विस बँक तुम्हाला तुमचा सिव्हिल स्कोर आणि ट्रॅक रेकॉर्ड चेक करून ही फॅसिलिटी बँक देवु शकते .पण या सेवेसाठी आपणास काही टक्के व्याज सदर बँकेस द्यावे लागेल

यूपीआय एटीएम बाबत आता आरबीआयने जपानमधल्या हिताची कंपनी सोबत करार केला आहे. त्यामुळे लवकरच युपी एटीएम भारतात सगळीकडे केले जाईल त्यामुळे जसं तुम्ही क्रेडिट आणि डेबिट कार्ड वापरून एटीएम मधून कॅश काढता आता त्याचप्रमाणे तुम्हाला यूपीआय क्यूआर कोड स्कॅन करून एटीएम मधून पैसे काढता येतात. 

या सर्व बदलांचा ग्राहकांच्यावर कोणता परिणाम होतो याचा एकंदरीत विचार करून पुढील काळामध्ये  एन एफ टी आर टी जी एस या ऑनलाइन पेमेंट साठी सुद्धा लागू होण्याची शक्यता आहे आणि लवकरच आरबीआय च्या वतीने त्याबद्दल ऑफिशियल अनाउन्समेंट सुद्धा केल्या जाऊ शकतात.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!