आपला जिल्हाताज्या घडामोडीनिपाणी परिसरमहाराष्ट्रशैक्षणिक

उद्या देवचंद महाविद्यालयात मा.अनसूयाबेन देवचंदजी शाह आंतरराज्यीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन!

महाराष्ट्र कर्नाटक गोवा या ठिकाणाहून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सहभागी होण्याची संधी निर्माण होणार आहे .

Kiran G.Patil M.No.8884357516


देवचंद महाविद्यालय अर्जुननगर येथे मा.स्वर्गीय अनसूयाबेन देवचंदजी शाह यांच्या स्मृतिदिना निमित्त (03 जानेवारी) मा.अनसूयाबेन देवचंदजी शाह आंतरराज्यीय वक्तृत्व स्पर्धा होत असून यामध्ये महाराष्ट्र कर्नाटक गोवा या ठिकाणाहून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सहभागी होण्याची संधी निर्माण होणार आहे .

ही स्पर्धा बुधवार दिनांक 03 जानेवारी 2024 रोजी देवचंद महाविद्यालय अर्जुननगर येथील ए.व्ही. हॉलमध्ये सकाळी दहा वाजता सुरू होणार आहे .स्पर्धेतील असलेले विषय पुढील प्रमाणे आहेत:

1.भारताने रचला इतिहास- चांद्रयान-3 मोहीम झाली खास

2. जल हेच जीवन

3.अरे युवका जागा हो ,विकासाचा धागा हो

4.स्त्री शक्तीचा नारा केवळ शब्दातच फुलतो: ‘भारत की बेटी’ चा मोहोर मणिपूरमध्ये जळतो

5.समाज माध्यमांच्या विळख्यात तरुणाई: राष्ट्रीय विकासाची आहे सर्वांनाच घाई.

या पूर्वतयारी स्पर्धेसाठी

प्रथम क्रमांक रु . 3001 व प्रमाणपत्र व कायमस्वरूपी ट्रॉफी,

द्वितीय क्रमांक रु .2001 व प्रमाणपत्र तसेच

तृतीय क्रमांक रु . 1001 व प्रमाणपत्र असे बक्षीस असून

उत्स्फूर्त स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक रु. 1001 रुपये व प्रमाणपत्र व कायमस्वरूपी ट्रॉफी,

द्वितीय क्रमांक रु . 701 व प्रमाणपत्र व

तृतीय क्रमांक रु . 501 व प्रमाणपत्र असे पारितोषिक आहे.

तसेच सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.या स्पर्धेसाठी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन स्पर्धा समिती प्रमुख डॉ. ए.एस.चिखलीकर आणि महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रो. डॉ जी डी इंगळे  यांनी केलेले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!