आपला जिल्हाकृषीताज्या घडामोडीनिपाणी परिसरमहाराष्ट्र

देवचंदच्या व्होकेशनल विभागाची औद्योगिक अभ्यास भेट ‌!

ग्राम नट्स मुमेवाडी आजरा येथे आयोजित करण्यात आली होती.

Kiran G.Patil M.No.8884357516


जनता शिक्षण मंडळाचे देवचंद कॉलेज, अर्जुननगर व्होकेशनल कॉमर्स विभागातील विपणन व विक्रयकला विषयाची औद्योगिक अभ्यास भेट दिनांक 29 डिसेंबर, 2023 रोजी ग्राम नट्स मुमेवाडी आजरा येथे आयोजित करण्यात आली होती.

सदर अभ्यास भेटी करिता ग्राम नट्स काजू प्रक्रिया उद्योग संस्थेचे मालक श्री. व्ही. बी. घाटगे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. त्यांनी काजू प्रक्रिया उद्योग कसा सुरू करायचा, त्यासाठी किती भांडवल आवश्यक आहे, भांडवल उभारणीचे मार्ग, शासकीय अनुदान, काजू गर वरील विविध प्रक्रिया , काजूचे विपणन व विक्री या बद्दल सविस्तर मार्गदर्शन विध्यार्थ्यांना केले.

यानंतर विद्यार्थ्यांनी चित्री येथील चित्री इको आणि ऍग्रो टुरिझमला भेट दिली. या ठिकाणी प्रो. अनिल मगर  यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी जंगल भ्रमंती करून विविध ऍडव्हेनचरस ऍक्टिव्हिटीज केल्या व वनभोजनाचा आनंद लुटला.

सदर अभ्यास भेटीचे आयोजन श्री.बिपीन पाटील  व श्री.वैभव पाटील ( व्होकेशनल कॉमर्स विभाग ) यांनी केले. या अभ्यास भेटी करीता जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री.आशिषभाई शाह, महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रो. डॉ. जी.इंगळे , उपप्राचार्य ए. डी. पवार , यांचे सहकार्य व मार्गदर्शनाने लाभले

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!