आपला जिल्हाक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्र

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि देवचंद कॉलेज अर्जुननगर यांच्या संयुक्त विद्यमाने कै. वि.स. खांडेकर व्याख्यानमालेचे आयोजन!

प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. सुनीलकुमार लवटे हे होते!

Kiran G.Patil M.No.8884357516


शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि देवचंद कॉलेज अर्जुननगर यांच्या संयुक्त विद्यमाने कै .भाऊसाहेब तथा वि.स. खांडेकर व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली . स्वागत व प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख डॉ. रमेश साळुंखे यांनी केले .

या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. सुनीलकुमार लवटे हे होते. ‘वि.स. खांडेकरांचे नव साहित्य आणि नवी दृष्टी’या विषयावर बोलताना म्हणाले की विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व स्पष्ट होणे गरजेचे असून कॉलेज जीवना पासूनच वाचणाशी मैत्री घट्ट करावी . त्यामुळे भाषण आणि वक्तृत्व या गोष्टींचे श्रवण करण्याची सवय लागते . खांडेकरांच्या लेखनातून ध्येयवाद व जीवनवाद दिसतो. वि. स. खांडेकर हे उपजतच समाजसेवी शिक्षक होते. खांडेकरां सारख्या गुरूंच्या सहवासातून मिळणारे संस्कार हे अतुलनीय असतात. शिक्षणाने माणूस घडतो आणि त्याच्यावर होणाऱ्या लेखन-वाचनाच्या संस्काराने तो परिपूर्ण होतो .खांडेकरांच्या प्रकाशित साहित्यात कथासंग्रह ,कादंबऱ्या, लघुनिबंध इत्यादी गोष्टींचा समावेश होतो .त्यांच्या साहित्यातून जीवनाचं प्रतिबिंब दिसून येते.कल्पनाप्रचुरता , आलंकारिकता , ध्येयवाद ही त्यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये होती. विद्यार्थ्यांनी खांडेकरांच्या विविध साहित्याचे विविध भाषांमध्ये झालेले भाषांतरही अभ्यासावे तसेच पुस्तकांचा संग्रह वाढवण्याची सवय लावली पाहिजे . रूपक कथा हा कथा प्रकार त्यांनी मराठीत सुरू केला व नव साहित्यातून बहुविध अंगाने लेखन केलेले दिसून येते. खांडेकरांच्या नव साहित्यातून निर्माण झालेले वाचन विसरता येत नाही. ते साहित्य आयुष्यभर तुमचा पाठलाग करते. जगण्याची नवी दृष्टी खांडेकरांच्या साहित्यातून मिळते. त्यांनी साहित्यात नव्या वाटा, नवी शैली निर्माण करून दिल्या . त्यामध्ये समाजाप्रती असणारी तळमळ दिसून येते.

अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ जी. डी. इंगळे म्हणाल्या की खांडेकरांच्या साहित्य लेखनात माणुसकीचा गहिवर दिसून येतो. त्यामुळेच त्यांनी जीवनदर्शन आणि ध्येयनिष्ठा साहित्यातून मांडलेली दिसून येते. सामाजिक प्रश्न, विविध मूल्ये आणि जीवनात उपयोगी पडणारे तत्त्वज्ञान त्यांच्या लेखनातून आपणास मिळते .

कार्यक्रमाचे आभार प्रा. शिवाजी कुंभार यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. कृष्णामाई कुंभार यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय डॉ. आशालता खोत यांनी करून दिला.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आशिषभाई शाह, उपाध्यक्षा डॉ.सौ तृप्तीभाभी शाह यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले.

डॉ प्रवीणसिंह शिलेदार यांचे मोलाचे सहकार्य लाभले . कार्यक्रमासाठी उपप्राचार्य डॉ.पी.पी. शाह , कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य अशोक पवार , सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुधाकर पोतदार,श्री दत्तात्रय पाटील, प्रा नानासाहेब जामदार, प्रा बी.जी. पाटील, मराठी विभागातील प्रा. प्रकाश पाटील प्रा. विष्णू पाटील , तसेच प्रा.विनायक कुंभार , महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते .

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!