आपला जिल्हाक्रीडाताज्या घडामोडीनिपाणी परिसरशैक्षणिक

कोल्हापूर झोनल पुरुष क्रिकेट स्पर्धेत कॉमर्स कॉलेज विजयी!

विजयी संघातील खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते मेडल व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.

Kiran G.Patil M.No.8884357516


देवचंद महाविद्यालयाच्या मैदानावर आज तृतीय क्रमांका साठी झालेल्या पहिल्या सामन्यात देवचंद महाविद्यालयाने नाईट कॉलेज संघाचा 66 धावांनी पराभव करून तृतीय क्रमांक पटकावला. देवचंदच्या श्रेयस मातीवड्डरने अष्टपैलू कामगिरी करत नाबाद 85 धावा व चार विकेट्स घेतल्या, तर प्रथमेश बांदिवडेकर यांनी 53 धावांचे योगदान दिले.

धावांचा पाठलाग करताना नाईट कॉलेजने 116 धावा केल्या त्यांच्या रचित चौगुलेने 36 तर आदित्यने 46 धावांचे योगदान दिले. अंतिम सामना महावीर कॉलेज विरुद्ध देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार कॉमर्स कॉलेज यांच्यामध्ये झाला.कॉमर्स कॉलेजने प्रथम फलंदाजी करताना 139 धावा केल्या.त्यांच्या वैभव पाटीलने 52 धावांचे योगदान दिले. धावांचा पाठलाग करताना महावीर कॉलेजचा संघ 85 धावा करू शकला. हा सामना कॉमर्स कॉलेज कोल्हापूरने 54 धावांनी जिंकून अजिंक्यपद पटकावले. विजयी तीन संघांची सांगली येथे होणाऱ्या शिवाजी विद्यापीठ आंतर विभागीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली आहे. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.जी.डी.इंगळे आय.क्यू.ए.सी.चेअरमन डॉ.पी.डी.शिरगावे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी विजयी संघातील खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते मेडल व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी नाईट कॉलेजचे प्राचार्य श्री.फराकटे सर, प्रा.योगेश पाटील डॉ. रोहित पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेसाठी पंच म्हणून श्री सुनील खांडके, श्री.अभिजीत सांडुगडे, श्री.महेंद्र सूर्यवंशी, श्री.युनूस शिकलगार, श्री.आर्यन माने, श्री.काशीम शिकलगार यांनी काम पाहिले.स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्पर्धाप्रमुख डॉ.रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.निरंजन जाधव श्री.संतोष वागळे, श्री.वैभव सोनार श्री.सुनील आडवी श्री.अनिल आडवी, श्री.विठ्ठल देशमुख श्री.महेश चौगुले श्री.पृथ्वीराज माळी तसेच वारणानगर येथील मैदानावर प्रा.बकस कुरणे यांनी परिश्रम घेतले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!