आपला जिल्हागुन्हाताज्या घडामोडीनिपाणी परिसरशैक्षणिक

देवचंद महाविद्यालय अर्जुननगर येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन!

कार्यक्रमाचे अध्यक्ष कागल दिवाणी न्यायाधीश श्री. बी. डी. गोरे हे होते!

Kiran G.Patil M.No.8884357516


देवचंद कॉलेज अर्जुननगर आणि तालुका विधी सेवा समिती कागल व कागल तालुका वकील बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने देवचंद महाविद्यालय अर्जुननगर येथे कायदे विषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.जी.डी.इंगळे यांनी शिबिराचे प्रास्ताविक व मान्यवरांचे स्वागत केले.

या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा आणि रहदारी संकेत चिन्ह या विषयावरती कागल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. गजेंद्र लोहार यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी रहदारी व वाहतूक नियम, रस्त्यावरील अपघाताची गंभीरता, सुरक्षिततेची आवश्यकता याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महिलांचा कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा विषयीची तरतूद आणि पीडित भरपाई योजना या विषया वरती कागल तालुका वकील बार असोसिएशनचे सदस्य ॲड. श्री संभाजी दावणे यांनी मार्गदर्शन केले. महिलांचे शोषण व लैंगिक शोषण याची संकल्पना व छळ या सदरात होणारा नेमका त्रास, त्याविषयी असलेल्या कायद्यांची तसेच नेमकी तक्रार केव्हा कुठे करावी याविषयीची माहिती दिली. ॲड. श्री. अभिजीत सांगावकर यांनी बेटी बचाव बेटी पढाओ या विषयावर मार्गदर्शन करताना नकोशी असलेली मुलगी आणि जन्म:ताच तिचा जगण्याचा हक्क नष्ट करण्याची प्रवृत्ती, स्त्री- पुरुष यातील भेद ,स्त्री शिक्षणाचा ऱ्हास या समस्या रोखण्यासाठी भारत शासनाच्या बेटी बचाव बेटी पढाओ या योजने अंतर्गत असलेली माहिती दिली. मुलींना शिक्षणाने समृद्ध केले पाहिजे व सक्षम बनविले पाहिजे असेही ते म्हणाले. कागलचे सह दिवाणी न्यायाधीश श्री. ए. बी. जवळे यांनी लैंगिक गुन्ह्या पासून मुलांचे संरक्षण करणारा कायदा म्हणजेच ‘पोक्सो कायदा’ याविषयीची सखोल माहिती दिली. विद्यार्थी आपल्या नकळत चुकीच्या दिशेने जीवनाच्या मार्गाकडे प्रवास करतो मात्र पुढे त्याचे होणारे घातक परिणाम याची जाणीव व या वयातील विद्यार्थ्यांची संवेदनशीलता सदसद विवेकाला अनुसरून असावी या विषयी मार्गदर्शन केले.

अध्यक्षीय भाषण करताना कागल दिवाणी न्यायाधीश श्री. बी. डी. गोरे यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये लिंगभाव समानता, विद्यार्थी व महिला यांच्यावर होणाऱ्या अत्याचार विरोधी संरक्षणात्मक कायदे, स्त्री भ्रूणहत्या प्रतिबंध व मुलींच्या शैक्षणिक समृद्धते विषयी जाणीव जागृती या विषयीचा आढावा घेऊन या शिबिराच्या आयोजनाचा उद्देश स्पष्ट केला. या शिबिरा वेळी ॲड. श्री.ए.एस. शितोळे कागल तालुका वकील बार असोसिएशनचे सचिव व महाविद्यालयातील IQAC समन्वयक डॉ.पी.डी. शिरगावे हे उपस्थित होते. महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रो. डॉ.प्रशांत शाह यांनी आभार मानले. राज्यशास्त्र विभागाच्या डॉ.सुजाता पाटील यांनी सूत्र संचालन केले.

या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष आशिषभाई शाह, संस्थेच्या उपाध्यक्ष डॉ.तृप्तीभाभी शाह यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले. ज्युनियर महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री. अशोक पवार, पर्यवेक्षिका सौ. एस. पी. जाधव व डॉ. अशोक डोनर, राज्यशास्त्राचे प्रा. श्री. नामदेव मधाळे, श्री. तुकाराम पाटील यांचे सहकार्य लाभले. या शिबिरासाठी विद्यार्थी व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!