Entertainmentआपला जिल्हाताज्या घडामोडीनिपाणी परिसरमहाराष्ट्रशैक्षणिक

भारतीय संस्कृतीत आजच्या गुरु-शिष्यांच्या नात्यालाच सर्वोच्च स्थान- प्रा. डॉ. जी डी इंगळे.

निपाणी कुमार मंदिर स्नेहसंमेलन कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून बोलत होत्या.

Kiran G.Patil M.No.8884357516


आजही जगात सर्वश्रेष्ठ नातं जर कोणतं असेल तर ते गुरु-शिष्याचेच आहे. याचीच अनुभूती आजच्या कुमार मंदिर बॅच १९८२ -८३ च्या विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या स्नेहसंमेलना निमित्त झाली. आज भारतीय संस्कृती अनाधी काळापासून टिकून आहे. या संस्कृतीमध्ये सर्वश्रेष्ठ स्थानी जर कोणत नात असेल तर ते गुरु शिष्याच आहे. असे म्हटल्यास वावगे ठरू नये. आज चाळीस वर्षानंतर सर्व विद्यार्थ्यांनी मिळून आजचा स्नेहसंमेलनाचा अभुतपूर्व सोहळा जो आयोजित केला होता हा खरोखरच मनाला भावणारा आहे. असे उद्गार प्राचार्य डॉ. जी डी इंगळे यांनी देवचंद महाविद्यालयात आयोजित स्नेहसंमेलनात काढले.

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीतांने करण्यात आली उपस्थितांचे स्वागत श्री संतोष लिगाडे यांनी तर प्रास्ताविक श्री प्रशांत गुंडे यांनी केले. श्री कुंभार गुरुजी, श्री जाधव गुरुजी, श्री शेटके गुरुजी, श्री दत्तागुरुजी, श्रीमती कमलाकर माईजी, यांचा शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या प्राचार्य डॉक्टर जी डी इंगळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सत्कार मूर्तींनी ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आणि सन्माना बद्दल कृतज्ञता व्यक्त केली. दुपारच्या सत्रात विविध गुणदर्शनचा कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केला. त्याला सर्वांनी भरपूर प्रतिसाद दिला.व प्रत्येक वर्षी आपण या कार्यक्रमास “यायलाच पाहिजे” ही परत साद घालून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वैभव कंगळे, संजय शेटके, किशोर फुटाणकर, विवेक परमणे, विजय भोपळे, राजू मेहता, भरत शहा, वैशाली महाजन, रूपा जोशी, मीनाक्षी काकतकर, वैशाली तासगावे, यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन अरुणा जोशी यांनी केले तर आभार सुनील हरदी यांनी मानले.


Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!