ताज्या घडामोडीनिपाणी परिसरमहाराष्ट्रशैक्षणिक

देवचंद कॉलेज अर्जुननगर येथे दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन

परिसंवादासाठी कर्नाटक व महाराष्ट्रातील विख्यात विद्यापीठांमधून प्रमुख वक्ते येणार आहेत

Kiran G.Patil M.No.8884357516


दि. 3 फेब्रुवारी 2024 : रसायनशास्त्र विभाग देवचंद कॉलेज, अर्जुननगर आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अर्थ सहाय्यित “रासायनिक विज्ञानामधील भविष्यातील दृष्टिकोन आणि नावीन्यपूर्ण संकल्पना” या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवाद दि.16 आणि 17 फेब्रुवारी 2024 रोजी आयोजित केला आहे. सदर परिसंवादासाठी कर्नाटक व महाराष्ट्रातील विख्यात विद्यापीठांमधून प्रमुख वक्ते येणार आहेत. परिसंवादासाठी देशभरांतील विद्यार्थी, शिक्षक व संशोधकांना आमंत्रण देण्यात आले आहे.

या परिसंवादाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्या, समन्वयक व रसायनशास्त्र विभागातील प्रा..ए.बी.गुरव, डॉ. ए.ए.रामटेके, डॉ.एस.ए.केनवडे, प्रा.एस.एस.कुराडे, डॉ. एस. के. पाटील, प्रा. रेश्मा धुमाळ, प्रा.अस्मिता पाटील यांनी परिश्रम घेतले आहेत. सदर परिसंवादात रसायनशास्त्र विषयांमध्ये सद्यस्थितीत सुरू असलेल्या संशोधनाचा व नाविन्यपूर्ण संकल्पनांचा आढावा घेतला जाईल अशी अपेक्षा आहे.

तरी इच्छुक अभ्यासकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन देवचंद महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रो. डॉ.जी.डी.इंगळे व परिसंवादाच्या समन्वयक प्रो. डॉ. सविता धोंगडे यांनी केले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!