ताज्या घडामोडीनिपाणी परिसरमहाराष्ट्रशैक्षणिक

देवचंद कॉलेज अर्जुननगर येथे एकदिवशीय कार्यशाळा संपन्न!

कार्यशाळेला विशेष तज्ञ म्हणून डॉ. अमोल अ. पाटील यांची उपस्थिती!

Kiran G.Patil M.No.8884357516


समाजशास्त्र विभाग देवचंद कॉलेज, अर्जुननगर आणि विजयसिंह यादव महाविद्यालय,पेटवडगाव, यांच्या संयुक्त विद्यमानेResearch Methodology – How to prepare Group project & Field Projectया विषयावर एकदिवशीय Online माध्यमातुन एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळेला विशेष तज्ञ म्हणून डॉ. अमोल अ. पाटील, सहयोगी प्राध्यापक, श्रीमती सी. बी. शाह महिला महाविद्यालय, सांगली लाभले . त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना सामाजिक संशोधन पध्दती, संशोधन पध्दतीच्या पायऱ्या व संशोधन पध्दतीच्या पायऱ्यांच्या आधारे समुह अहवाल आणि क्षेत्र अहवाल यांचे उदाहरणासहीत Power Point Presentation च्या माध्यमातुन अतिशय सुक्ष्मपणे, सविस्तर, साध्या-सरळ व सोप्या शब्दांत मांडणी करत विद्यार्थ्यांना समजावुन दिले.

या कार्यशाळेस अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रो. डॉ. पी. पी. शाह लाभले. अध्यक्षीय भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना आज समाजातील संशोधनाची असणारी आवश्यकता, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून करावे लागणारे संशोधन, व या संशोधनाच्या पूर्ततेसाठी आजचे मार्गदर्शन किती महत्वाचे आहे याबाबतची जाणीव करून देत, विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीतील संशोधना करिता शुभेच्छा दिल्या.

सदर कार्यशाळेत 400 हुन अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या कार्यशाळेचे थेट प्रक्षेपण देवचंद कॉलेज, अर्जुननगर आणि विजयसिंह यादव महाविद्यालय, पेठवडगांव यांनी महाविद्यालयांच्या सभागृहातून विद्यार्थ्यांना उपलव्ध करून देण्यात आले. या व्यतिरिक्त online च्या माध्यमातुन 300 हुन अधिक विद्यार्थ्यांनी कार्यशाळेचा लाभ घेतला.

कार्यशाळेचे प्रास्ताविक डॉ सुषमा जाधव- लिमकर यांनी केले.यांची ओळख डॉ. प्रभाकर निसर्गंध यांनी करून दिली . कार्यक्रमाचे आभार डॉ आनंद गाडीवडु यांनी मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ सुप्रिया देसाई यांनी केले.

सदर कार्यशाळा पार पाडण्यास जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आशिषभाई शाह, उपाध्यक्षा डॉ. सौ. तृप्तीभाभी शाह यांचे अनमोल सहकार्य व मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. जी डी इंगळे यांचे व विजयसिंह यादव महाविद्यालय, पेठवडगाव चे प्रभारी प्राचार्य डॉ. अमोल चव्हाण यांचे मार्गदर्शन लागले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!