ताज्या घडामोडीनिपाणी परिसरमहाराष्ट्रशैक्षणिक

सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा अवार्ड 2024 चा क्रिएटिव्ह परफॉर्मन्स विजेता पुरस्काराने देवचंद कॉलेज अर्जुननगर सन्मानित  

तर प्रा. प्रशांत कुंभार यांना एक्स्ट्रा माईल रिकग्नेशन अवार्ड मिळाला!

Kiran G.Patil M.No.8884357516


दिनांक 10 फेब्रुवारी 2024 रोजी पुणे येथे संपन्न झालेल्या क्विक हिल फाउंडेशन मार्फत सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा अवार्ड 2024 चा अवार्ड देवचंद महाविद्यालय अर्जुननगर ला देऊन सन्मानित करण्यात आले. देवचंद कॉलेज अर्जुननगर येथील संगणकशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी क्विक हिल फाउंडेशनच्या वतीने सायबर सुरक्षा जागरूकता महिन्याचे औचित्य साधून ‘सायबर सुरक्षा व जागरूकता’ या विषयावर ‘कमवा आणि शिका’ योजने अंतर्गत प्रशिक्षण घेण्यात आले होते. 50 विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणात भाग घेतला होता. निपाणी व परिसरातील 10,000 विद्यार्थ्यांचे देवचंद कॉलेजच्या सायबर वारियर कडून सायबर जागरूकतेतुन प्रबोधन केले. याची दखल घेऊन क्विक हिल फाऊंडेशन ने कॉलेजमधील 10 विद्यार्थी, 1 शिक्षक आणि देवचंद कॉलेजला नॉमिनेशन होते. त्यापैकी समृद्धी भराडे आणि शितल शिरगावे या दोन विद्यार्थिनींना बेस्ट प्रोसेस कंप्लायंस अवार्ड, तर  प्रा. प्रशांत कुंभार यांना एक्स्ट्रा माईल रिकग्नेशन अवार्ड तर देवचंद कॉलेज अर्जुननगरला क्रिएटिव्ह परफॉर्मन्स अवार्ड मिळाला. हा सन्मान स्वीकारताना        महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रो. डॉ. जी. डी. इंगळे, प्रा. प्रशांत कुंभार, क्विक हिल फौंडेशन च्या सी.ओ. ई.अनुपमा काटकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष आशिषभाई शाह व उपाध्यक्षा डॉ.सौ. तृप्तीभाभी शाह, महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रो.डॉ. जी. डी. इंगळे व उपप्राचार्य प्रो. डॉ. पी. पी. शाह याचे मार्गदर्शन लाभले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!