क्रीडाताज्या घडामोडीनिपाणी परिसरमहाराष्ट्र

देवचंद कॉलेज 11 वी कला शाखे मधील श्रीश संदीप अनगळ हिने तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केले.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर आयोजित शासकीय 67 वी राष्ट्रीय फेन्सिंग ( तलवारबाजी) स्पर्धा

Kiran G.Patil M.No.8884357516


जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर आयोजित शासकीय 67 वी राष्ट्रीय फेन्सिंग ( तलवारबाजी) स्पर्धा सन २०२३-२४ क्रीडा संकुल छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न झाल्या. सदर स्पर्धेमध्ये देवचंद कॉलेज,अर्जुननगर इयत 11 वी आर्ट्स ( कला शाखा) मधील श्रीश संदीप अनगळ यांनी 17 वर्षाखालील फेन्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत सेबर प्रकारात वैयक्तिक व सांघिक असे दोन्हीही इव्हेंट मध्ये सुवर्णपदक प्राप्त केले.

त्याला संस्थेचे अध्यक्ष आशिषभाई शाह, उपाध्यक्षा डॉ. सौ.तृप्तीभाभी शाह, महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रो.डॉ.जी.डी.इंगळे ,उपप्राचार्य प्रो.डॉ.पी.पी.शाह, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य ए.डी.पवार, पर्यवेक्षिका एस.पी. जाधव , जिमखाना प्रमुख डॉ आर.जी.चव्हाण, क्रीडा शिक्षक निरंजन जाधव, प्रशिक्षक प्रफुल धुमाळ ,संतोष वाघळे, वैभव सोनार व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!