ताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरराजकीय

महात्मा बसवेश्वर संस्थेचे एक हजार कोटींच्या ठेवीसह मल्टीस्टेटचे उद्दिष्ट- डॉ. चंद्रकांत कुरबेट्टी

34 वा वर्धापन दिन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा!

Kiran G.Patil M.No.8884357516


संस्थेच्या स्थापनेपासूनच सामाजिक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून संस्थेची मार्गक्रमाना चालू असून महात्मा बसवेश्वर संस्थेच्या सध्या कर्नाटक मध्ये एकूण 31 शाखेतून व्यवहार चालू असून नवीन 100 शाखा विस्तार करण्याचा मानस आहे. सध्या संस्थेच्या स्वमलकीच्या पाच इमारती असून,लवकरच या संस्थेच्या माणकापूर, कोगनोळी, एकसंवा, गळतगा, संकेश्वर व यमकनमर्डी येथे शाखा विस्तार होणार आहेत. संस्थेची मल्टीस्टेट खाली नोंदणी करून कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा राज्यात विस्तार करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे संस्थापक चेअरमन डॉ. चंद्रकांत कुरबेट्टी यांनी सांगितले. संस्थेच्या 34 व्या वर्धापन दिन कार्यक्रमात ते बोलत होते.

डॉ. कुरबेट्टी म्हणाले, अध्यात्माची जोड देत सामाजिक भान जपत आम्ही सर्व संचालक मंडळ पारदर्शक कारभार करत असून, नवीन शाखा विस्तारामुळे युवकांना नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. नव्या बँकिंग तंत्र प्रणालीचा अवलंब करून कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. संस्थेचा कारभार राजकारण विरहित सुरू असून सर्व कर्मचाऱ्यांना पगार वाढीसह विविध सोयी सवलती दिल्या जात आहेत. संस्थेची उत्तरोत्तर प्रगती होण्यासाठी आमच्या संस्थेतर्फे वीस ते पंचवीस कर्मचारी सर्व नागरिकांना घरपोच सेवा देण्यासाठी कार्यरत असतात यादेखील संधीचा सभासदांनी लाभ करून घेण्याचे आवाहन केले.

प्रास्ताविक श्रीकांत परमणे यांनी केले. दीपप्रज्वलन प्राणलिंग स्वामी व महेशानंद स्वामींनी केले. महेशानंद स्वामी म्हणाले, या संस्थेमुळे अनेकांना रोजगार मिळाला आहे. डॉ. चंद्रकांत कुरवेट्टी यांच्या नेतृत्वाखाली संस्थेची वाटचाल उत्तम प्रकारे सुरू असून जे पाचशे कोटीचे उद्दिष्टे साध्य केले आहे त्याच गतीने किंवा त्यापेक्षा थोड्या लवकरच एक हजार कोटींच्या ठेवीचे उद्दिष्ट पूर्ण होणार यामध्ये तिळमात्र शंका नसल्याचे सुतोवाच केले.

प्राणलिंग स्वामी म्हणाले, संस्थेने कोणताही जातीभेद न करता कार्य केल्यानेच उत्तरोत्तर प्रगती होत आहे. वर्धापन दिन कार्यक्रमात हालशुगरचे माजी चेअरमन चंद्रकांत कोठीवाले, सहकाररत्न उत्तम पाटील, सुनील पाटील, प्रसन्नकुमार गुजर यांच्यासह संघ संस्थांचे मोठे ठेवीदार व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. सीईओ शशिकांत आदण्णावर नवीन निर्मळे यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला.

यावेळी कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष सुरेश शेट्टी संचालक डॉ. एस आर पाटील  किशोर बाली, श्री प्रताप एस पट्टणशेट्टी, श्री श्रीकांत बी परमणे, श्री. महेश व्ही बागेवाड़ी, श्री.अशोक लिगाडे श्री सदानंद ए दुमाले, श्री प्रताप जे मेत्राणी, सौ पुष्पा सी कुरबेट्टी, श्रीमती विजया ए शेट्टी, सौ. सुवर्णा पी पट्टणशेट्टी, श्री.सदाशिव एन धनगर, दिनेश पाटील, यांच्यासह कर्मचारी वर्ग उपस्थित होता.सुजाता जाधव व राजेंद्र मगदूम यांनी सूत्रसंचालन केले. एम. जी. बडीगेर यांनी आभार मानले.


संस्थेतर्फे एक हजार रक्त बाटल्या देण्याचे उद्दिष्ट …..

संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी रोटरी क्लब रक्तपेढीच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. संस्थेच्या सर्व शाखांमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करून 1 हजार बाटल्या रक्त संकलित केले जाणार असल्याचे डॉ. चंद्रकांत कुरबेट्टी यांनी सांगितले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!