क्रीडाताज्या घडामोडीनिपाणी परिसरमहाराष्ट्र

निपाणी मावळा ग्रुपची शिवनेरी गडकोट मोहीम फत्ते!

200 हुन अधिक मावळे मोहीमेत सहभागी, स्वच्छता मोहीम, मर्दानी खेळांच्या सादरीकरणाने वातावरण शिवमय!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी  येथील मावळा ग्रुपच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त किल्ले शिवनेरी गडकोट मोहीम फत्ते झाली. या मोहिमेमध्ये 200 हुन अधिक मावळे व रणरागिणीनी सहभाग घेतला होता. शुक्रवारी 23 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी प्रस्थान झालेल्या मोहिमेने प्रथम वढू बुद्रुक, ओझरचा विघ्नेश्वर व लेण्याद्रीचा गिरिजात्मक गणेशाचे  दर्शन घेतले. त्यानंतर रविवारी शिवनेरी गडावर दर्शन घेऊन या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली. त्याचबरोबर मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके व पारंपारिक वाद्यांचा गजर करत गडावरील वातावरण शिवमय केले. या मोहिमेला वीरुपाक्षलिग समाधी मठाचे परमपूज्य प्राणलिंग महास्वामीजी, प. पू प्रभुलिंग महास्वामीजी यांचे दिव्य सानिध्य लाभले होते.

मावळा ग्रुप अध्यक्ष आकाश माने, उपाध्यक्ष महादेव चव्हाण खजिनदार राहूल सडोलकर- भाटले यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम पार पडली. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता निपाणी शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. यानंतर बसने सुमारे अडीचशे मावळे व रणरागिणी वढू बुद्रुक कडे रवाना झाल्या. शनिवारी सकाळी वढु बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर ओझर येथील गणपतीचे दर्शन घेण्यात आले. त्यानंतर सायंकाळी लेण्याद्री येथील गणेशाचे दर्शन घेऊन तेथे मुक्काम करण्यात आला. रविवारी सकाळी शिवनेरी गडावर प्रस्थान करण्यात आले. यानंतर संपूर्ण गडावर मावळा ग्रुपचे संचालक राहुल पाटील यांच्या पुढाकाराने स्वच्छता मोहीम राबवली. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळी पारंपरिक वाद्यांचा गजर व शिव गीते सादर झाली. मोहिमेत सहभागी झालेल्या युवती व युवकांनी मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके करून दाखवली. यामुळे गडावरील वातावरण शिवमय झाले होते. श्रेयस हेगडे व समर्थ हेगडे या दोन बालकांनी हलगीचा कडकडाट करून वातावरण निर्माण केले होते.

या मोहिमेत वढू -बुद्रुक येथे हरी नवले, लेण्याद्री येथे शिव व्याख्याते सतीश साठे तर शिवनेरी गडावर पर्यावरण तज्ञ रमेश खरमाळे व राजेंद्र झुंजारे यांची व्याख्याने झाली. यानंतर गडकोट दर्शन झाल्यानंतर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मोहिमेची सांगता नारायणगाव येथील प्रति बालाजी मंदिर दर्शनाने झाली. उपक्रमास माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, आमदार निलेश लंके यांचेही मार्गदर्शन लाभले. मावळा ग्रुपचे उत्सव समिती अध्यक्ष अनिल चौगुले, संतोष चव्हाण, उपाध्यक्ष शांतीनाथ मुदकूडे, विनायक खवरे, खजिनदार सुशांत कांबळे मुख्य समन्वयक दादा जनवाडे, यांच्यासह संचालक विजय बुरुड, महादेव बन्ने, हेमंत चव्हाण, सागर खांबे, विशाल बुडके, यांनी ही मोहीम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले. सल्लागार उदय शिंदे व संजय चिक्कोडे यांचेही मार्गदर्शन लाभले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!