क्राईमताज्या घडामोडीनिपाणी परिसर

निपाणीतील एका भीषन अपघातात एक ठार

गीतांजली चित्रमंदिर समोर घडला अपघात!

Kiran G.Patil M.No.8884357516


आज शनिवार दिनांक 2 मार्च 2024 रोजी रात्री नऊच्या दरम्यान घडलेल्या एका अपघातात एकजण जागीच ठार झाला असून दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार सदरचा युवक सतरा वर्षाचा असून तो निपाणी येथील बांधकाम व्यवसायीकाकडे कामास होता तो मूळचा झारखंडचा असल्याचे समजते.

निपाणी येथील छत्रपती संभाजी राजे चौकातून सदरचा युवक मुरुडच्या दिशेने निघाला होता त्याचवेळी निपाणीच्या दिशेने चार चाकी वाहन येत होते. पण दुचाकी वरील वाहकाचे नियंत्रण सुटल्यामुळे गीतांजली चित्र मंदिराच्या समोरा समोर झालेल्या एका भीषण अपघातात सदरचा तरुण जागीच ठार झाला. घटनेची माहिती समजताच निपाणी शहर पोलीस ठाण्याच्या निरीक्षक उमादेवी गौडा व त्यांच्या सहकाऱ्यांनी येऊन घटनेचा पंचनामा करून पुढील तपासासाठी महात्मा गांधी रुग्णालयात मृतदेह पाठवून देण्यात आला. तेथे सदरच्या युवकास मृत घोषित करण्यात आले. युवकाचे नाव क्रिष कुमार असून त्याचे वय 17 असल्याचे प्राथमिक माहिती वरून समजते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!