ताज्या घडामोडीनिपाणी परिसरमहाराष्ट्रशैक्षणिक

देवचंद कॉलेजमध्ये ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ साजरा. 

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉ. वर्षा खुडे या होत्या!

Kiran G.Patil M.No.8884357516


देवचंद कॉलेजमध्ये 28 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. थोर शास्त्रज्ञ सी. व्ही. रामन यांनी 28 फेब्रुवारी 1928 या दिवशी रामन इफेक्टचा शोध लावला. त्याबद्दल त्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. म्हणून 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉ वर्षा खुडे म्हणाल्या की विद्यार्थ्यांना शास्त्रज्ञांच्या जीवन कार्याची ओळख होणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी चिकित्सक वृत्ती जोपासावी व संशोधनाला प्राधान्य द्यावे. त्यांनी अनेक शास्त्रज्ञ व संशोधकांची उदाहरणे व दाखले देऊन विज्ञानाचे महत्त्व पटवून दिले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्या प्रो.डॉ जी. डी इंगळे म्हणाल्या, “विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांच्या सुसज्ज प्रयोगशाळेचा वापर संशोधनासाठी करावा व महाविद्यालयाच्या लौकिकात भर टाकावी. थोर भारतीय गणिततज्ञ रामानुजन यांनी आपल्या संशोधनाने संपूर्ण जगाला अचंबित केले. विद्यार्थ्यांनी त्यांच्यापासून प्रेरणा घ्यावी.

कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष आशिषभाई शाह व उपाध्यक्षा डॉ.सौ.तृप्तीभाभी शाह यांचे प्रोत्साहन लाभले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाचे समन्वयक प्रा एम आर शेंडगे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.निलंबिका धयारकर यांनी केले तर आभार प्रा. जयशिला करडे यांनी मानले. पाहुण्यांचा परिचय प्रा.डॉ पूनम शेटके यांनी करून दिला. ‘विज्ञान प्रश्नमंजुषा’ घेऊन सर्व मान्यवरांच्या हस्ते गुनानुक्रमे प्रथम तीन विद्यार्थ्यांना पारितोषिक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य अशोक पवार ,पर्यवेक्षिका प्रा एस पी जाधव , प्रा डॉ. अशोक डोनर, प्रा सचिन खोत, प्रा शितल चिवळकर , आप्पा पाटील आदी उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!