ताज्या घडामोडीनिपाणी परिसरराजकीय

निपाणीतील प्रभाग क्रमांक 2 सार्वजनिक सुविधांपासून कोसो दुर- आकाश माने

पाणी, कचरा आणि गटारी तुंबल्या, नागरिक हतबल, सार्वजनिक आरोग्य धोक्यात!

Kiran G.Patil M.No. 8884357516


निपाणी(4) येथील शहरातील प्रभाग दोन मध्ये येणाऱ्या भोपळे गल्ली, दगडी चाळ परिसरात विविध समस्यांनी डोके वर काढले आहे. यामुळे या परिसरातील नागरिकांनी याबद्दल नाराजी व्यक्त करत समस्या सोडवण्याची मागणी केली आहे. पाणी, कचरा आणि गटारी तुंबल्या असून नागरिक हतबल झाले आहेत. 

दगडी चाळ, भोपळे गल्ली या ठिकाणी रिकाम्या जागेत कचरा साचला असून पालिकेने याकडे दुर्लक्ष केले आहे. गेल्या वर्षभरापासून या ठिकाणी असलेल्या कुपनलिकेची दुरुस्ती न केल्यामुळे पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. तर दुसरीकडे गटारींची स्वच्छता करण्याकडे ही पालिकेने दुर्लक्ष केल्याने दुर्गंधी पसरली आहे. परिसरातील बालकांचे, वयोवृद्धांचे आरोग्य धोक्यात आले असून गटारी तुंबल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित प्रशासकीय अधिकारी व पालिका प्रशासन जाणून बुजून या विभागाकडे दुर्लक्ष करत आहे का? असा सवाल आता या प्रभागातील नागरिक विचारत आहेत. पी बी रोड पासून प्रवेश करतानाच पेव्हर ब्लॉकची दुरुस्ती न करण्यात आल्यामुळे हा रस्ता खराब झाला आहे. तर बाजूला कचऱ्याचा मोठा ढिग पडला असून यामुळे या ठिकाणी दुर्गंधी पसरली आहे.

या बाजूलाच लहान बालकांचा दवाखाना, आयुर्वेदिक दवाखाना व प्रसुती दवाखाना असल्याने या ठिकाणी उपचार घेत असलेल्या रुग्णांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यांचे आरोग्य धोक्यात आले असून सर्व समस्या सोडवाव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

यावेळी वैशाली यादव, बाळू परीट, राजू माने, मल्हारी सावंत, सुरेंद्र घोटणे, शांताबाई सावंत, राधाबाई माने, संदीप माने आदी उपस्थीत होते.

कूपनलिका नारुदुस्त…

सध्या निपाणी शहराचा पाणी प्रश्न ऐरणीवर आला आहे. भोपळे गल्लीत कूपनलिका असून त्याला पाणी ही आहे. पण कुपनलिका दुरुस्त केलेली नाही प्रतिवर्षी पालिकेला दुष्काळ निधी उपलब्ध होत असतो पण याचा वापर कूपनलिका दुरुस्तीसाठी करण्यात आलेला नाही. यामुळे पाणी प्रश्न बिकट बनला आहे.

सामाजिक कार्यकर्ते आकाश माने यांचा आंदोलनाचा इशारा …..

प्रभाग क्रमांक दोन मधील भोपळे गल्लीत अनेक समस्या आहेत. आजपर्यंत या विभागाकडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करत असून लवकरात लवकर या समस्या सोडवाव्यात. अन्यथा नागरिकांना घेऊन नगरपालिके समोर ठिय्या आंदोलन करणार आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!