क्राईमताज्या घडामोडीनिपाणी परिसर

शिरगुपीत एकाचा बुडुन मृत्यू!

शेततळ्यात तोल जाऊन ओढवला मृत्यू, परिसरात हळहळ!

Kiran G.Patil M.No.8884357516


शिरगुपी येथील शेततळ्यात एकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली असून घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार व पोलीस सूत्राच्या हवाले असे समजते की मयत सचिनकुमार सुनील सिंग वय 18 राहणार कुमरवाह जिल्हा राजैली झारखंड राज्यातील असून येथे जेसीबी मशीन ऑपरेटर म्हणून काम करत होता.

आज दुपारी साडेअकराच्या दरम्यान शिरगुपी गावातील शेतामध्ये काम करत असलेला व्यक्ती जवळपास असणाऱ्या एका शेततळ्यामध्ये सदरचा युवक कपडे धुऊन आंघोळ करण्यासाठी गेला होता. सदर इसमास पोहता येत नसल्यामुळे पाय घसरल्या नंतर अगदी नऊ ते दहा फूट खोल असलेल्या शेततळ्यामध्ये त्याचा बुडुन मृत्यू झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सदर जेसीबी मशीन बिद्री गावचे असून जेसीबी मालक सचिन मगदूम घटनास्थळी उपस्थित होते. घटनेची माहिती समजताच शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक उमादेवी गौडा व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह बाहेर काढून पंचनामा करून पुढील उत्तरीय तपासणीसाठी महात्मा गांधी रुग्णालयास पाठवून दिला.

जाऊ नकोस म्हणताना गेला……

मयत सचिन जेसीबी ऑपरेटर असून उन्हाच्या झळा सहन न झाल्यामुळे तो शेततळ्यामध्ये जाऊन आंघोळ करण्याच्या विचारात होता म्हणून जवळच असणाऱ्या शेततळ्याकडे तो जात असता शेततळ्याचे मालक श्री आप्पासाहेब हजारे यांनी त्या व्यक्तीस शेततळ्याकडे जाऊ नकोस असे ठणकावून सांगितले होते. पण या युवकांने ऐकले नाही व काळाचा घाला त्याच्यावर पडला व त्याचा दुर्दैवी अंत झाला.

शेततळ्याची सुरक्षितता ऐरणीवर……

राज्य शासनाच्या कृषी होंडा योजने अंतर्गत खेडेगावातील अनेक शेतावर शेततळे निर्मिती करून उन्हाळ्यामध्ये पाण्याची कमतरता भासत न  देण्यासाठी एक वेगळा उपक्रम म्हणून अनेक  ठिकाणी शेततळ्याची निर्मिती केली होती पण शेततळ्यामध्ये एखादी व्यक्ती अडकली तर त्या व्यक्तीला बाहेर येण्यास अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. त्यामुळे शेततळ्याची सुरक्षितता ऐरणीवर आली असून प्रत्येक शेततळ्यामध्ये पोहता न येणाऱ्या व्यक्तीच्या आधारासाठी एक हवेची ट्यूब टाकून ठेवणे गरजेचे झाले आहे.

तीनच दिवसांपूर्वी आला व जीवाला मुकला…..

मयत जेसीबी ऑपरेटर मागील तीन दिवसा पूर्वीच  शिरगुपीत आला होता कारण यापूर्वीच्या मशीन ऑपरेटरचे लग्न ठरल्यामुळे त्यांनी शेतातील काम आपल्या थांबू नये म्हणून आपल्या गावाकडील सचिन कुमार सिंगला बोलावून घेऊन काम चालू ठेवले होते. पण तीनच दिवसांपूर्वी आलेल्या व्यक्तीचा दुर्दैवी अंत झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!