ताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रशैक्षणिक

संत गजानन महाराज अभियांत्रीकी महाविद्यालयात नवप्रवर्त्य-2024 कार्यक्रम उत्साहात साजरा.

प्रमुख पाहुणे म्हणून श्री. निखिल पडते (जंग फॉऊडेशन) व श्री.अनंत पाटील ( फेअरफिल्ड, शिनोळी) हे उपस्थित होते.

Kiran G.Patil M.No.8884357516


संत गजानन महाराज अभियांत्रीकी महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर लिड काॅलेज क्लस्टर (21) अंतर्गत “नवप्रवर्त्य-2024” हा तांत्रिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून इचलकरंजीचे श्री. निखिल पडते (जंग फॉऊडेशन) व श्री.अनंत पाटील (एच. आर. फेअरफिल्ड, शिनोळी) हे उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत प्राचार्य, डॉ. संजय सावंत यांनी केले. प्रास्ताविक मनोगता मध्ये प्राचार्यांनी स्पर्धेचा उद्देश व महत्व सांगितले. यामध्ये एकूण अकरा प्रकारच्या स्पर्धेत चारशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

यामध्ये प्रामुख्याने गोवा, बेळगांव, चिक्कोडी, कोल्हापूर, सांगली, सातारा या भागातून अभियांत्रीकीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. कोड क्युझिंग, प्रोजेक्ट एक्स्पो, टेक्नीकल क्विज, पेपर, पोस्टर प्रझेन्टेशन, टेक्नो डॉक, आयडिया हॅकथॉन, क्रेझी कॉन्ट्रॅप्शन, ब्रिज डिसाईन, कोड क्वीस्ट, टेक टाॅक, ब्लु आय थिकिंग अशा प्रकारच्या स्पर्धा वेगवेगळ्या विभागा अंर्तगत घेण्यात आल्या.

यावेळी श्री. प्रथमेश आंबेरकर, श्री. संदिप कुंभार, श्री. प्रमोद फराकटे, श्री. अनिकेत पाटिल, श्री. राहूल सांगले, डॉ. तन्वीर बागबान, श्री. दयानंद सोनार, श्री. अभिजीत गाताडे, श्री. विजयकुमार अडके, श्री. नागेश बसरीकट्टी, श्री. विनायक करंबळी यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. विजेत्या विद्यार्थ्यांना संस्थेचे विश्वस्त डाॅ. यशवंत चव्हाण यांच्या हस्ते प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व रोख पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.

स्पर्धेसाठी समन्वयक म्हणून प्रा. ममता पाटील, प्रा. विकास साळुंखे प्रा. एस.पी. देशमूख यांनी काम पाहिले. प्रा. सचिन मातले, प्रा. राहूल देसाई यांच्यासह विभागप्रमूख, प्रा. अमरसिंह फराकटे, प्रा. शिवलिंग स्वामी, प्रा. सचिन सनदी,प्रा. विनायक घाटगे, प्रा. प्रदीप चिंधी, डॉ. अमोल माने, विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हजर होते.

सुत्रसंचालन प्रा. संतोष पोवार यांनी केले. स्पर्धेचे यशस्वी नियोजना बद्दल विश्वस्थ डॉ.संजय चव्हाण, संस्थापक अध्यक्ष डॉ. अण्णासाहेब चव्हाण यांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमास प्राचार्य डॉ. संजय सावंत यांचे मार्गदर्शन लाभले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!