क्रीडाताज्या घडामोडीनिपाणी परिसरशैक्षणिक

मॉडर्न इंग्लिश स्कूल मध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा दीक्षांत समारंभ!

शाळेच्या प्रिन्सिपाल सौ स्नेहा आर घाटगे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषविले!

Kiran G.Patil M.No.8884357516


दिनांक 21 मार्ग  रोजी मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये यंदाच्या वर्षातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा दीक्षांत समारोह पार पडला. शाळेच्या प्रिन्सिपाल सौ स्नेहा आर घाटगे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषविले तर शाळेतील इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थित होते.

बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपले शाळे बद्दलचे मनोगत व्यक्त केले. तर त्यांच्या या वर्षातील स्मृतींना उजाळा देण्यासाठी फोटो अल्बम व्हिडिओ स्वरूपात दाखविण्यात आला. तसेच मनोरंजनाचे कार्यक्रमही विद्यार्थ्यांच्या कडून करून घेतले गेले. प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांचा या वर्षाच्या प्रगती बद्दल पारितोषके देऊन त्यांना गौरविण्यात आले.

अध्यक्ष स्थानावरून बोलताना सौ स्नेहा आर घाटगे म्हणाल्या की मुलांच्या शालेय जीवनातून झालेली जडणघडण व संस्काराची शिदोरी घेऊन उत्तमरीत्या त्यांचा आयुष्याचा प्रवास हा सुरू होतो. सौ कला एस मेनसे म्हणाल्या की शालेय जीवनातून घेतलेल्या अनुभवाच्या आणि ज्ञानाच्या आधारे विद्यार्थ्यांची जरी खरी वाटचाल होत असली तरी त्यांनी आनंदमय प्रवास हा स्वीकारावा, कारण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर पुढचा टप्पा चढणे हे महत्त्वाचा असते. श्री सुकुमार घोरवाडे  यांनी सुद्धा मुलांना शुभेच्छा देत विद्यार्थ्यांनी एक चांगला सुसंस्कारी माणूस बनणे कसे महत्त्वाचे आहे हे सांगितले. सौ मैत्रीयी पाटील म्हणाल्या की विद्यार्थ्यांच्या सवयीच माणसाला घडवितात आणि बिघडवितात म्हणून योग्य सवयी लावून घेणे खूप गरजेचे आहे.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेच्या प्राचार्या सौ स्नेहा आर घाटगे, सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!