आपला जिल्हाक्राईमताज्या घडामोडीनिपाणी परिसर

कोडणी (ता निपाणी) गांजा पिकाचे अनधिकृत भरघोस उत्पादन!

उसाच्या पिकामध्ये आंतरपीक घेतले गांजाचे! एकाची हिंडलगा कारागृहात रवानगी!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी व परिसरामध्ये सध्या लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असले तरी आचारसंहितेच्या काळात अशा काही घटना घडत आहेत की पोलीस यंत्रणा देखील खडबडुन जागी होत आहे. कोडणी (ता. निपाणी) येथील शेतकऱ्याने चक्क ऊसामध्ये गांजाचे आंतरपीक घेतल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. निपाणी पोलिसांच्या विशेष पथकाने मंगळवारी धाड टाकून या शेतकऱ्याला अटक केली. सदाशिव धोंडीराम खवरे (वय 55) असे अटक केलेल्या संशयित शेतकऱ्याचे नाव असून त्याच्याकडून सुमारे 3 लाख रुपये किंमतीचा 9 किलो गांजा जप्त केला. विशेष म्हणजे खवरे यांनी उसामध्ये गाजांचे आंतरपीक घेतल्याचे समजल्या नंतर परिसरातील शेतकरी नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, संशयित सदाशिव खवरे हे व्यवसायाने शेतकरी आहेत. त्यांनी आपल्या शेतीमध्ये गांजा पिकाचे आंतरपीक घेतल्याची माहिती खास खबऱ्याकडून पोलिसांना मिळाली. त्यानुसार सीपीआय बी.एस.तलवार ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक मनीकंठ पुजारी, हवालदार प्रभू सिद्धाठगीमठ, शेखर असोदे,आर.एस.पाटील, रघु मेलगडे एम.डी. खोत यांनी सापळा रचुन संबंधित गांजा पिकाची उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याला रंगेहाथ पकडले. यावेळी पोलिसांनी पालिका आयुक्त जगदीश हुलगेजी, दैहीक शिक्षण अधिकारी शांताराम जोगळे, निपाणीचे तलाठी आनंद मडिवाळ यांच्या उपस्थितीत घटनास्थळाचा पंचनामा केला.

यावेळी तपास पथकाने खवरे यांच्या ऊस पिकाची पाहणी करून 9 किलो गांजा जप्त करून खवरे यांच्यावर अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करून त्याला निपाणी न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने त्याची हिंडलगा जेलमध्ये रवानगी केल्याची माहिती सीपीआय बी. एस. तळवार यांनी दिली.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!