आपला जिल्हाताज्या घडामोडीनिपाणी परिसरमहाराष्ट्रशैक्षणिक

देवचंद मध्ये “शरद स्कॉलर परीक्षा” 4 एप्रिल रोजी!

प्रथम क्रमांकास तब्बल 1 लाखांचे बक्षिस!

Kiran G.Patil M No.8884357516


अर्जुननगर, ता.26:  इचलकरंजी यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग याच्यावतीने बारावी सायन्सच्या सन 2023-24 विद्यार्थ्यांसाठी ‘शरद स्कॉलर 2024’ या परिक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. परिक्षा गुरुवारी ता.04 एप्रिलला राज्यातील विविध जिल्ह्यातील केंद्रावर होणार आहेत. यामध्ये प्रथम येणा-या विद्यार्थ्याला 1लाख रुपयांसह अनुक्रमे 50 हजार, 40 हजार, 30 हजार व 20 हजार रुपये बक्षिस व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यातील प्रथम विद्यार्थ्यास 10 हजार रुपये व इतर पाच विद्यार्थ्यांना प्रत्येकी 2 हजार रुपयांचे बक्षिस आहे. परिक्षेसाठी नोंदणी करताना शुल्क 50 रुपये भरावे लागतील. 

परिक्षा बहुविकल्पीय (MCQ) असून एकूण 75 प्रश्न असतील. मॅथ्स प्रश्न 25 (50 गुण), फिजिक्स प्रश्न 25 (25 गुण) व केमिस्ट्री प्रश्न 25 (25 गुण) असतील. ही परिक्षा कोल्हापूर जिल्हयातील कोल्हापूर, इचरकरंजी, जयसिंगपूर, मुरगुड, गडहिंग्लज, आजरा, चंदगड, गारगोटी येथे तर सांगली जिल्ह्यात सांगली, मिरज, म्हैशाळ, इस्लामपूर व पलूस या केंद्रावर, सोलापूर (सोलापूर, सांगोला, दहिवडी), सातारा-कराड, पाटण, पुणे, रत्नागिरी, निपाणी मध्ये देवचंद कॉलेज, अर्जुननगर या केंद्रावर होणार आहेत. सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळणार आहे.

विद्यार्थी परिक्षेसाठी ऑनलाईन रजिस्टर https://forms.gle/sb76SFivN4Gc7vCK9 ह्या लिंकवर करावे. अधिक माहितीसाठी 18002331419,या टोल फ्री  क्रंमाकावर संपर्क करावे अशी माहिती महाविद्यालया मार्फत देण्यात आली आहे.सदर परीक्षा 4 एप्रिल 2024 रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेत देवचंद कॉलेज , अर्जुननगर येथे होणार आहे.महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रो डॉ जी.डी इंगळे यांनी इयत्ता बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याचे आवाहन केले आहे.

ज्यांनी फॉर्म भरलेला नाही त्यांनी नोंदणीसाठी परीक्षे दिवशी सकाळीं 10 : 00 वाजता कॉलेज मध्ये उपस्थित राहून अधिक माहितीसाठी प्रा अनिल खोत (गणित विभाग) यांच्याशी संपर्क साधावा .

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!