आपला जिल्हाक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रशैक्षणिक

शिवाजी विद्यापीठाच्या कलर्स अवॉर्डने देवचंदच्या क्रीडा संचालकसह चार खेळाडु सन्मानित!

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.डी.टी.शिर्के व प्र. कुलगुरु डॉ.पी.एस.पाटील यांच्या शुभहस्ते!

Kiran G.Patil M.No.8884357516


शैक्षणिक वर्ष 2022 -23 मध्ये विविध क्रीडा प्रकारांमध्ये शिवाजी विद्यापीठाला पदक मिळवून दिलेले खेळाडू व प्रशिक्षक यांना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के व प्र. कुलगुरु डॉ.पी.एस.पाटील यांच्या शुभहस्ते व कुलसचिव डॉ.व्ही.एन.शिंदे, क्रीडा विभाग प्रमुख डॉ.शरद बनसोडे व विद्यार्थी विकास मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. प्रकाश गायकवाड यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.

यामध्ये देवचंद महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. डॉ.रवींद्र चव्हाण यांना अखिल भारतीय आंतर विद्यापीठ वेटलिफ्टिंग स्पर्धा व खेलो इंडिया अंतर विद्यापीठ स्पर्धेतील शिवाजी विद्यापीठ संघाचे प्रशिक्षक म्हणून केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल ब्लेझर, ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन कुलगुरूंच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

तसेच शिवछत्रपती पुरस्कार विजेती आंतरराष्ट्रीय कुस्ती खेळाडू कु.स्वाती शिंदे, तायक्वांदो खेळाडू श्री.शहंशाह मुजावर, श्री.ओमकार मार्तंड व कु. वैष्णवी साळुंखे या चार खेळाडूना ही अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठाला मेडल्स मिळवून दिल्याबद्दल कुलगुरूंच्या हस्ते ब्लेझर, ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. एकाच वेळी चार खेळाडू व प्रशिक्षक यांचा सन्मान होण्याची  देवचंद महाविद्यालयाच्या  इतिहासामधील ही पहिलीच वेळ आहे.

यशस्वी खेळाडूंना जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष  आशिषभाई शाह, उपाध्यक्षा डॉ.सौ. तृप्तीभाभी शाह, खजिनदार श्री.सुबोधभाई शाह तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रो.डॉ.जी.डी.इंगळे, उपप्राचार्य प्रो.डॉ.पी.पी.शाह यांचे प्रोत्साहन लाभले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!