आपला जिल्हाक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

मत्तीवडे ( तालुका हुक्केरी) येथील स्वागत कमान कोसळली!

सोसाट्याच्या वाऱ्यात व मान्सून पुर्व पावसाने कमान जमीनदोस्त. 

Kiran G.Patil M.No.8884357516


मत्तीवडे तालुका हुक्केरी येथील स्वागत कमान सोसाट्याच्या वाऱ्यात व मान्सून पुर्व पावसाने स्वागत कमान जमीनदोस्त झाली असून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार आज बुधवार दिनांक 22 मे रोजी दुपारी साडेतीनच्या दरम्यान वीस वर्षांपूर्वी स्वखर्चाने बांधलेली स्वागत कमान अचानक पणे कोसळली. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नसून आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असून या मार्गावरील सर्व वाहतूक ठप्प झाली आहे.

महाराष्ट्र राज्यात प्रवेश करण्यासाठी सर्वात जवळचा मार्ग म्हणून हिटणी मार्गे वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते. या मार्गावरील रस्ता देखील खड्डेविरहित असल्यामुळे या मार्गावर चार चाकी व अवजड वाहनांची येजा मोठ्या प्रमाणात असते पण अचानक कोसळलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे.

घटनेचे वृत्त गावामध्ये वाऱ्यासारखे पसरल्यानंतर सर्व गावकऱ्यांनी येऊन घटनास्थळी गर्दी केलेली असून, मदत कार्यासाठी गावकरी एकवटले असून वाहतूक सुरळीत करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न चालू आहेत. तरी जोपर्यंत वाहतूक सुरळीत होत नाही तोपर्यंत पर्याय मार्गाने जाण्याची आवाहन गावकऱ्यांतर्फे करण्यात येत आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!