आपला जिल्हाक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रशैक्षणिक

मोहनलाल दोशी विद्यालयाची एस.एस.सी.परीक्षेत उज्ज्वल निकालाची परंपरा कायम!

एस.एस.सी. परीक्षा मार्च 2024 चा निकाल 100 टक्के लागला!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी (27) अर्जुननगर प्रतिनिधी.

येथील मोहनलाल दोशी विद्यालयाचा एस.एस.सी. परीक्षा मार्च 2024 चा निकाल 100 टक्के लागला असून उज्ज्वल निकालाची सहा दशकांची अखंड परंपरा शाळेने यावर्षीही कायम राखली आहे.

 विद्यालयातून एकूण 211विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी 211 विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यामधील 128 विद्यार्थी (डिस्टिक्शन) विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण ,तर 61 विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये तसेच 17 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत व 5 विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणी घेऊन यशस्वी झाले.

त्यामधील कु.आदर्शा सुरेश पाटील 96.60 टक्के गुण मिळवुन अर्जुननगर केंद्रात व विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला, तर कु.धनश्री गिरीश पोकले 96 टक्के गुणासह द्वितीय, तर कु.साक्षी हेमंतकुमार पोवार 95.60 टक्के गुणासह तृतीय क्रमांक पटकावला. त्याबद्दल समाजाच्या विविध स्तरातून त्यांचे कौतुक केले जात आहे.

 यशस्वी विद्यार्थ्यांना जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री आशीषभाई शाह, उपाध्यक्षा श्रीमती प्रतिभाभाभी शाह, व डॉ.सौ तृप्तीभाभी शाह यांच्यासह सर्व संचालक मंडळाचे प्रोत्साहन लाभले. तर मुख्याध्यापिका  सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!