आपला जिल्हाकृषीताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रशैक्षणिक

सिद्धगिरी हॉस्पिटल कणेरीमठ येथे हृदयरोग शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत!

अँजिओग्राफी,अँजिओप्लास्टी, सह बायपास सर्जरीचा समावेश! (16 मे ते 30 जून 2024 पर्यंतच)

Kiran G. Patil M.No.8884357516


सिद्धगिरी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे एका तपाहून अधिक काळ “निराधारांना आधार” या एकाच तत्वावर चालू असलेल्या हॉस्पिटलमध्ये आम्ही सर्व गोरगरीब रुग्णांसाठी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील शासनाच्या योजनेनुसार 16 मे ते 30 जून 2024 पर्यंत मोफत अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी व बायपास सर्जरी उपलब्ध करून दिली असल्याची माहिती काल पत्रकार परिषदेला संबोधित करताना कणेरी मठाचे परमपूज्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी दिली.

पश्चिम महाराष्ट्रातील एन. ए. बी. एच. मानांकित धर्मादाय श्रेणीतील अग्रेसर ‘सेवाभावी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल’ अशी ओळख निर्माण केली आहे. याच सेवा शृंखलेत आता “ना नफा ना तोटा” या तत्वावर मोफत व माफक दरात व पारदर्शक सेवा देणासाठी अत्यंत अत्याधुनिक असा हृदयरोग विभाग कार्यरत आहे.

डॉ. गणेश इंगळे यांनी गेली 12 वर्ष हृदयरुग्णां साठी प्रसिद्ध अशा नामांकित संस्थेत सेवा दिली आहे, ते आता सिद्धगिरी हॉस्पिटलच्या माध्यमातून आपली आरोग्य सेवा समाजातील सर्वच स्तरातील लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी कार्यरत झाले आहेत. त्यांच्या आरोग्य कौशल्याचा समाजातील गरजू लोकांनी या आरोग्य सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजींनी केले.

यावेळी बोलताना प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. गणेश इंगळे म्हणाले, ‘पुणे ते बेंगलोर या परिक्षेत्रात धर्मादाय श्रेणीत पहिल्यांदाच अत्याधुनिक तंत्रज्ञानासह, वेगवेगळ्या चाचण्यांसह एकाच छताखाली हृदयरुग्णांना सेवा उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे हृदयरुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अगदी लहान वयातील बालकांनाही हृदयरोगाशी सामना करावा लागत आहे. आज हृदयरुग्णांवर अत्याधुनिक उपचार घेणे हि क्लिष्ट बाब झाली आहे. आज सिद्धगिरी हॉस्पिटल मध्ये हृदयाशी संबंधित कोरोनरी अँजिओग्राफी, कोरोनरी अँजिओप्लास्टी, पेरीफेरल इंटरव्हेंशन- रिनल अँजिओग्राफी, रिनल अँजिओप्लास्टी, कायमस्वरूपी पेसमेकर रोपण हे उपचार केले जातात. तसेच स्ट्रक्चरल हार्ट इंटरव्हेंशन साठी आवश्यक उपचार हि दिले जातात. याशिवाय ए.एस.डी, पी.डी.ए, व्ही.एस.डी, कोअरक्टोप्लास्टी उपचार तसेच हृदयाची शस्त्रक्रिया हि केली जाते. हे सर्व उपचार सिद्धगिरी रुग्णालयाच्या ‘ना नफा ना तोटा’ या तत्वानुसार मोफत, माफक व पारदर्शकपणे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हृदयरुग्णां करिता उपचार करण्यासाठी ‘सिद्धगिरी हृदयरोग’ विभाग आशेचा किरण ठरेल. या सेवेचा लाभ गरजू रुग्णांनी घ्यावा.

या वेळी अधिक माहिती देताना वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रकाश भरमगौडर म्हणाले, “पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या मार्गदर्शनानुसार हा विभाग कार्यान्वित आहे. या विभागामुळे वंध्यत्व उपचार अत्यंत पारदर्शकपणे करण्यास अधिक हातभार लागणार आहे. या विभागात उपचार प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर गुणवत्तेशी तडजोड न करता अत्यंत अत्याधुनिक अशी कॅथ लॅब सह अन्य अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध करून देण्यात आली आहे.”

यावेळी डॉ. गणेश इंगळे यांनी यांनी या विभागाच्या विविध तंत्रज्ञानाची माहिती दृक-श्राव्य (व्हिडीओ) माध्यमांच्या द्वारे उपस्थित पत्रकारांना दाखवून माहिती विशद केली. यावेळी या परिषदेची प्रस्तावना व आभार विवेक सिद्ध यांनी केले. यावेळी सिद्धगिरी हॉस्पिटलचे राजेंद्र शिंदे, कुमार चव्हाण, सत्याप्पा बाणे, दयानंद डोंगरे व अभिजित चौगले यांच्यासह रुग्णालय कर्मचारी उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!