आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

चिकोडीतून प्रियांका जारकीहोळी यांचा दणदणीत विजय!

जारकीहोळींनी तब्बल 90 हजार 834 मताधिक्याने विजयी पताका फडकवत अण्णासाहेब जोल्लेचा पराभव केला.!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी (4 जुन 2024)  प्रतिनिधी.

अत्यंत चुरशीने पार पडलेल्या 18 व्या लोकसभेच्या चिकोडी मतदार संघात काँग्रेसच्या प्रियांका सतिश जारकीहोळी प्रचंड मताधिक्याने विजय झाल्या आहेत. भारतातील अठराव्या लोकसभेच्या सर्वात तरुण खासदार म्हणून त्यांनी दिमाखात संसदेत प्रवेश केला आहे. सध्या त्या 27 वर्षाच्या आहेत.

चिकोडी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांनी सत्तांतर घडवत तब्बल 90 हजार 834 मताधिक्याने विजय मिळविला. त्यांनी भाजपचे विद्यमान खासदार अण्णासाहेब जोल्ले यांचा पराभव केला. प्रियांका जारकीहोळी यांना 7 लाख 13 हजार 461 मते, तर अण्णासाहेब जोल्ले यांना 6 लाख 22 हजार 627 मते मिळाली. पहिल्या फेरीपासून प्रियांका जारकीहोळी आघाडीवर होत्या. व ती आघाडी तोडण्यात जोल्लेना शेवटपर्यंत अपयश आले. शेवटी जारकीहोळींनी 90 हजार 834 मताधिक्याने विजयी पताका फडकवली. व जोल्लेना दारून पराभव पत्करावा लागला. निपाणीतील 30 हजाराचे मताधिक्य देखील भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण करत आहे.

तीस हजारांचे मताधिक्य विचार करायला लावणारे….

मागील विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप, काँग्रेस, व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये तिरंगी लढत झाली होती. यामध्ये भाजपच्या विद्यमान आमदार सौ. शशिकला जोल्ले यांनी  बाजी मारली होती. याची पुनरावृत्ती न होण्याची खबरदारी उत्तम पाटील गट व काँग्रेसने घेतल्यामुळे तीस हजारांचे मताधिक्य निपाणी मतदारसंघात मिळाल्याचे बोलले जात आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!