आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

तवंदी येथे खासदार प्रियांका जारकीहोळी यांच्या विजयाची मिरवणूक चक्क बैलगाडीतून.!

सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब राजाराम पाटील (गोल्डन बाबा) व माजी पंचायत अध्यक्ष संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली.

Kiran G.Patil M.No.8884357516


चिकोडी लोकसभा मतदारसंघातून अण्णासाहेब जोल्ले यांचा दारून पराभव करत विजयाची पताका फडकवत तब्बल 90 हजार पेक्षा जास्त मतांनी पराभव करणाऱ्या नवनिर्वाचित व सर्वात तरुण खासदार प्रियांका जारकीहोळी यांच्या विजयाची मिरवणूक तवंदी येथे चक्क बैलगाडीतून काढण्यात आली.

तवंदी येथील शेतकरी सिद्धू पाटील यांची बैलगाडी काल मिरवणुकीसाठी वापरण्यात आली. सायंकाळी पाच ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत हलगीच्या तालावर नाचत सर्व कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.

तवंदी गावातील उत्तम अण्णा प्रेमी व काँग्रेस प्रेमी कार्यकर्ते खूप मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. त्याच बरोबर महिला व बालचमुनी देखील मोठ्या प्रमाणात मिरवणुकीमध्ये सहभाग नोंदवला. तसेच आजी माजी सैनिक संघटना, ग्रामपंचायतचे माजी चेअरमन, सदस्य व सर्व संघटनचे पदाधिकारी अनेक सेवा संस्थातील पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या सर्व मिरवणुकीचे नियोजन गोल्डन बाबा तथा बाबासाहेब राजाराम पाटील  व ग्रामपंचायत माजी अध्यक्ष संजय पाटील यांनी केले होते. मिरवणुकी नंतर सर्व गावकऱ्यांसाठी भोजनाची व्यवस्था देखील केली होती.

यावेळी तवंदी गावचे पंचायत सदस्य श्री संजय पाटील, संगीता पाटील, राजू गुरव, नंदा गुरव, एसडीएमसी अध्यक्ष संतोष ठाकरे व इतर जेष्ठ व प्रतिष्ठित नागरिक सहभागी झाले होते अत्यंत उत्साही व जोशपूर्ण वातावरणात मिरवणूक काढण्यात आली होती.गोल्डन बाबा यांनी मिरवणूकी नंतर सर्वांचे आभार मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!