आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

उत्तम पाटील राष्ट्रवादी गटाकडून खा.जारकीहोळींचा नागरी सत्कार!

युवा नेते उत्तम पाटील यांच्याकडून नागरिक सत्काराचे नेटके नियोजन!

Kiran G.Patil M.No.8884357516


राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उत्तम पाटील गटाकडून मला निपाणीतून जो काय मताचा प्रतिसाद मिळाला आहे. त्याची परतफेड मी करू शकत नाही. पण कामाच्या माध्यमातून मी कोणत्याही गटा तटाचा विचार न करता सर्वसमावेशक काम करून निपाणी मतदारसंघांमध्ये विकास कामाचा डोंगर निर्माण करण्यास मागेपुढे पाहणार नाही. असे मत काल खासदार जारकीहोळी यांनी व्यक्त केले.

नुकत्याच पार पडलेल्या चिकोडी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तब्बल 90000 पेक्षा जास्त मतांनी विजयाची मुहूर्तमेढ रचणाऱ्या देशातील सर्वात तरुण खासदार म्हणून बिरुदावली मिरवणाऱ्या नवनिर्वाचित खासदार प्रियांका जारकीहोळी यांचा काल निपाणी येथे उत्तम पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व उत्तम पाटील युवाशक्ती यांच्या संयुक्त विद्यमाने सत्काराचे आयोजन आराम मंगल कार्यालय येथे केले होते. त्याप्रसंगी खासदार जारकीहोळी बोलत होत्या.

प्रारंभी निपाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विद्यमान खासदारांना शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन नागरी सत्कार करण्यात आला. त्या पसंगी आपले मनोगत व्यक्त करताना असोदे म्हणाले आम्ही आपणास निवडून आणण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केले असून आपण देखील भविष्य काळामध्ये निपाणीच्या विकासासाठी कटिबद्ध राहण्याचे आवाहन केले.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यामध्ये एक प्रकारची समन्वयकाची भूमिका बजावणारे काँग्रेसचे चिकोडी  जिल्हा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे देखील व्यासपीठावर उपस्थित होते. त्यांनी आपले मनोगत व्यक्त करत म्हणाले की हे दोन्ही पक्ष नसून एका नाण्याच्या दोन बाजू असून एकत्रित काम करत आपण मतदारसंघांमध्ये एक आदर्श निर्माण करू.

सहकार रत्न उत्तम पाटील म्हणाले की कोण म्हणत असेल की हा काँग्रेसचा किंवा राष्ट्रवादी पक्षाचा विजय असेल तर ते चुकीचे असून माझ्या मते हा विजय माझ्या निपाणीतील सर्व कार्यकर्त्यांचा असून नेहमीच मी कार्यकर्ताच हा माझा पक्ष समजतो व भविष्यात देखील आमची मार्गक्रमांना याच मार्गावर असेल. निपाणी येथील ज्येष्ठ नागरिक व रिपब्लिक पार्टीचे नेते अविनाश कट्टी यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी राजू पाटील, नगरसेवक रवींद्र शिंदे, शौकत मणेर, संजय पावले, संजय सांगावकर, उपासना गारवे, राणी शेलार दिलीप पठाडे अनिता पठाडे यांच्यासह सर्व नगरसेवक नगरसेविका सर्व संस्थांचे पदाधिकारी ग्रामीण भागातील सर्व ग्रामपंचायत अध्यक्ष सदस्य व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सत्कार सोहळ्याचे स्वागत प्रास्ताविक व आभार प्रदर्शन बाळासाहेब सूर्यवंशी यांनी केले.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!