आपला जिल्हाक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रशैक्षणिक

मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा!

प्रमुख पाहुणी शाळेची माजी विद्यार्थिनी पर्यावरण प्रेमी कु. फिजा चाऊस होती!

Kiran G.Patil M.No.8884357516


बेळगाव मराठा मंडळ संचलित मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षण आणि भारतीय सण परंपरा या विषयी भाषण केले.

प्रमुख पाहुणे म्हणून आमच्या शाळेची माजी विद्यार्थिनी पर्यावरणवादी आणि पक्षीप्रेमी कुमारी फिजा चाऊस होत्या. यांनी सध्याच्या काळात मानवी जीवन समृद्ध होण्यासाठी छोट्या छोट्या आपल्या दैनंदिन जीवनातील कृती मधून आपण पर्यावरणाचे कसे संरक्षण करू शकतो हे वेगवेगळ्या उदाहरणातून मुलांना सांगितले तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असलेल्या प्राचार्या स्नेहा घाटगे यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले की भारतीय संस्कृती इतकी समृद्ध आहे की ती वेगवेगळ्या सणांनी नटलेली आहे. तर प्रत्येक सणा मागचा हेतू हा पर्यावरण पूरक तर आहेच आणि पर्यावरण संरक्षण कसे करता येते हे देखील सर्व भारतीय सण आम्हास ज्ञान देतात आणि त्या पद्धतीने हल्लीच्या पिढीने त्याची माहिती जाणून घेऊन तो आनंदाने साजरा करणे हे आजच्या काळाची गरज आहे.

प्रारंभी कुमार समर्थ पाटील यांनी स्वागत केले. तर इयत्ता नववीची विद्यार्थ्यांनी कुमारी स्वरा जाधव, कुमारी सिमरा जमादार, कुमारी आर्या खोत, आणि कुमारी संस्कृती खराडे यांनी पर्यावरण दिनानिमित्त विविध भाषणे केली त्याचबरोबर कुमार रुद्र बुवा यांनी सूत्रसंचालन केले तर कुमार स्मिथिल रावण यांनी आभार मानले.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील विज्ञान शिक्षिका पी यु वागळे, स्मिता पवार, प्रिया डिग्रज, रश्मी सिदनाळे आणि शाळेतील इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!