आपला जिल्हाक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

निपाणीत श्री महात्मा बसवेश्वर संस्थेच्या सभागृहावर स्लॅबभरणी!

स्लॅबकामाचा प्रारंभ करताना संचालक प्रताप पट्टणशेट्टी, शेजारी संस्थापक चेअरमन डॉ. चंद्रकांत कुरबेट्टी व मान्यवर.

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (7)

येथील महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेच्या चिकोडी रोडवरील मुख्य कार्यालयावर नव्याने बांधण्यात येत असलेल्या सभागृहाच्या स्लॅबकामाचा प्रारंभ ज्येष्ठ संचालक प्रताप पट्टणशेट्टी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.

यावेळी संस्थापक चेअरमन डॉ. चंद्रकांत कुरबेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती. या सभागृहामुळे संस्थेचे सर्व कार्यक्रम एकाच ठिकाणी घेणे शक्य होणार आहे. संस्थेची उलाढाल वाढल्याने मुख्य कार्यालय अपुरे पडत आहे. त्यासाठी सध्या असलेल्या सभागृहामध्ये मुख्य कार्यालयाचे विस्तारीकरण करणे व तिसऱ्या मजल्यावर सभागृहाची उभारणी करण्यात येत आहे. संस्थेचे सीईओ शशिकांत आदन्नावर यांनी स्वागत केले. यावेळी संचालक दिनेश पाटील, अभियंता दीपक माने यांच्यासह संस्थेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!