आपला जिल्हाकृषीक्राईमक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

(Invalid Tap Connections) जनता तहानलेली आणि निपाणी नगरसेवक अनधिकृत कनेक्शनसाठी व्याकुळ!

निपाणीतील काही आजी माझी नगरसेवकांच्या घरी अनधिकृत बोरवेलचे चावी कनेक्शन!

Kiran G.Patil M.No.8884357516


जेव्हा कुंपणच शेत खातं त्यावेळेला न्याय मागायचा कोणाकडे अशी परिस्थिती सध्या निपाणीतील जनतेची झाली आहे. कारण दिवसेंदिवस निपाणी नगरीची लोकसंख्या भरमसाठ वाढत असून त्यामानाने शुद्ध पाणीसाठा कमी प्रमाणात असल्यामुळे मागील तीन महिन्यापासून सर्व निपाणीकर शुद्ध पाण्यासाठी अहोरात्र भटकंती करत असताना. एक अजब प्रकारच समोर आला आहे.

निपाणी नगरपालिकेतील काही आजी-माजी नगरसेवकांच्या घरासमोरील असलेल्या  सरकारी बोरवेलचे नळ कनेक्शन अनधिकृतपणे नगरसेवक किंवा नगरसेविकेच्या पति राजांनी नगरपालिकेशी संगनमत करून किंवा दमदाटी करून कनेक्शन प्राप्त करून घेतली असून निपाणीतील जनता पाण्यासाठी भटकंती करत असून अनधिकृत नळ कनेक्शन साठी नगरसेवक मात्र व्याकुळ झालेले दिसतात.

सूत्रांच्या माहितीनुसार असे समजते की लवकरच प्रशासनाकडून सर्व नळ कनेक्शनची अधिकृत तपासणी होणार असून बोरवेल ला जोडलेले घरगुती अनधिकृत नळ कनेक्शन काढून टाकून त्यांच्याकडून दंड वसूल करण्याची व्यवस्था केली जाणार आहे. दरम्यान, निपाणीतील एका गोडवाडी वार्डामध्ये तर बोरवेलचे अनधिकृत कनेक्शन सरकारी गटारी पोखरून पार पलीकडच्या गल्लीमध्ये घेऊन गेलेले आहेत. अशी चर्चा सध्या परिसरात आहे.

आपल्या वॉर्डातील पाणी समस्या दूर करून जनतेचे कैवारी बनणाऱ्या नगरसेवकांनी सर्वसामान्य निपाणीकर ज्या समस्येला सामोरे जात आहेत. त्या समस्येला आपण देखील सामोरे जाऊन त्या समस्येवर कायमस्वरूपी मार्ग काढून सर्वसामान्य निपाणीकरांची समस्या समजून घेण्याचे आवाहन करण्यात येत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!