आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

“गोष्ट चिंटू आणि खुशीची” लघुचित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

निर्माता दिग्दर्शक अभिजीत सोकांडे यांची माध्यमांना माहिती!

Kiran G.Patil M.No.8884357516


प्रत्येक व्यक्ती ही समाजाचं काही देणे लागत असते. चित्रपटाच्या माध्यमातून मानवी मनावर खूप बरे वाईट परिणाम होत असतात, आजच्या आधुनिक युगाच्या माध्यमातून बरीच युवा पिढी सोशल मीडियावर गुंतलेली आहे यासाठी समाजामध्ये प्रबोधन करण्यासाठी ऊर्जा फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत रेबीज विषयावर प्रबोधनात्मक लघुपट “गोष्ट चिंटू आणि खुशीची” हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. अशी माहिती लेखक दिग्दर्शक निर्माते अभिजित सोकांडे यांनी माध्यमांशी बोलताना दिली,

या चित्रपटाच्या प्रमुख भूमिकेत बालकलाकार संस्कृती सोकांडे ही आहे, श्वानाच्या चाव्याने होणारा रेबिज रोगावर प्रकाश टाकणाऱ्या या चित्रपटाच्या माध्यमातून समाजामध्ये जनजागृती करण्याचा मानस अभिजीत सोकांडे यांनी व्यक्त केला,

रेबिज सारखा महाभयानक रोगांची शिकार झाल्याने अनेक निष्पाप बालकांचा बळी जातो, यासाठी पालकांच्या मध्ये जनजागृती करण्यासाठी या चित्रपटाची निर्मिती केली असल्याचे सांगितले. यावेळी मुख्य भूमिकेत असणारी बालकलाकार संस्कृती,आणि सहनिर्माती मनीषा सोकांडे यांनीही माध्यमांची आपली प्रतिक्रिया व्यक्त केली..

हा लघुचित्रपट रविवार 23 जून रोजी सकाळी ठीक नऊ वाजता राजश्री चित्र मंदिरात प्रीमियर शो प्रदर्शित होणार असून बालक पालक व महिलांसाठी स्वागतमूल्य फक्त पन्नास रुपये असून, लकी ड्रॉ च्या माध्यमातून पहिल्या प्रेक्षकास रेंजर सायकल भेट स्वरूपात देण्यात येणार आहे. तसेच या कार्यक्रमांमध्ये पर्यावरण प्रेमी, सर्पमित्र, यावर यासारख्या समाज क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या णी सह परिसरातील नागरिकांनी हा चित्रपट पाहण्याचे आवाहन दिग्दर्शक निर्माते अभिजीत सोकांडे यांनी केले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!