आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

महात्मा बसवेश्वर सौहार्द संस्थेतर्फे आयोजित विविध स्पर्धांना उस्फूर्त प्रतिसाद!

वचन कंठपाठ स्पर्धेत समर्थ रोडगे व श्रेया जलपुरे तर भाषण स्पर्धेत रिद्धी सूर्यवंशी व कीर्ती हंचनाळे विजेते!

Kiran G.Patil M.No.8884357516


येथील श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेच्या वतीने सलग तिसऱ्या वर्षी महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त व सिद्धेश्वर महास्वामींच्या स्मरणार्थ विविध स्पर्धा संपन्न झाल्या. यावेळी घेण्यात आलेल्या भाषा स्पर्धेत इयत्ता पाचवी ते सातवी गटात रिद्धी सूर्यवंशी आठवी ते दहावी गटात  कीर्ती हंचनाळे  यांनी प्रथम क्रमांक मिळवला. वचन कंठपाठ  स्पर्धेत पहिली ते पाचवी गटात समर्थ रोडगे सहावी ते नववी गटात श्रेया जलपुरे यांनी प्रथम क्रमांक मिळवला.

समाधी मठाचे प्राणलिंग स्वामीजी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी संस्थेचे संस्थापक चेअरमन डॉ. चंद्रकांत कुरबेट्टी यांनी मनोगत व्यक्त केले. विजेत्यांना प्रत्येकी 1001 501 व 201 रुपयाची बक्षिसे संस्थापक चेअरमन डॉ. चंद्रकांत कुरबेट्टी व्हाईस चेअरमन सुरेश शेट्टी व संचालकांच्या हस्ते देण्यात आली.

स्पर्धेत सुमारे 80 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता परीक्षक म्हणून आय एम शिरगावे एम आर कुन्नूर श्रुती शिरगावे यांनी काम पाहिले.

कार्यक्रमास संचालक डॉ. एस आर पाटील  किशोर बाली, श्री प्रताप एस पट्टणशेट्टी, श्री श्रीकांत बी परमणे,  श्री. महेश व्ही बागेवाड़ी, श्री.अशोक लिगाडे श्री सदानंद ए दुमाले, श्री प्रताप जे मेत्राणी, सौ पुष्पा सी कुरबेट्टी, श्रीमती विजया ए शेट्टी, सौ. सुवर्णा पी पट्टणशेट्टी, श्री.सदाशीव एन धनगर, दिनेश पाटील, संस्थेचे सी ई ओ शशिकांत आदन्नावर यांच्यासह कर्मचारी वर्ग उपस्थित होता. कार्यक्रमात सुजाता जाधव यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!