आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

मनाचे संतुलन राखण्यासाठी योग आवश्यकच- आमदार शशिकला जोल्ले!

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त केले प्रतिपादन!

Kiran G.Patil M.No.8884357516


संपूर्ण जगाला योगाची देणगी आपल्या देशाने दिली आहे. मागील पाच हजार वर्षांपूर्वीपासून आपल्या देशाला योगाची परंपरा आहे. सन 2014 रोजी अखंड भारताचे यशस्वी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सभेमध्ये 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस करण्या संदर्भात ठराव मांडला. त्याला सर्वानुमते 193 पैकी 175 देशांनी सहमती दर्शवल्या नंतर 21 जून 2015 पासून आंतरराष्ट्रीय योग दिवस चालू झाला आहे आज आंतरराष्ट्रीय योग दिवस दहावा असून सर्वत्र मोठ्या उत्साहात दहावा योग दिवस साजरा केला आहे.

आज निपाणी येथे शिवशंकर जोल्ले पब्लिक स्कूलच्या पटांगणावर ठीक सकाळी सहा वाजता सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत व आमदार शशिकला जोल्ले व माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या उपस्थितीत सर्व निपाणीकरांनी आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला.

निपाणी पतंजली योगपीठ व संपूर्ण प्रशासनाच्या विद्यमाने आज आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. प्रारंभी सर्वांच्या वतीने प्रशासकीय पातळीवर सर्वांचे स्वागत करुन योग कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. पतंजली योगपीठाच्या सर्व साधकांनी व स्वतः आमदार जोल्ले यांनी प्रत्यक्षात योगाचे धडे दिले.

आजच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमास निपाणीचे तहसीलदार बडिगेर, सी पी आय बी.एस. तलवार, नगरपालिका आयुक्त जगदीश हुलगेज्जी, हेस्कॉम अभियंता अक्षय चौगुले, जयवंत भाटले, राजु गुंदेशा, अभिजित गायकवाड, निपाणी शहर, ग्रामीण व बसवेश्वर पोलीस,व खडकलाट पोलीस स्टेशनचे पी. एस. आय. तसेच पतंजली योग पीठाचे साधक सौ. तिळवे, विनोद शिप्पुरे, यांच्यासह सर्व प्रशासकीय अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!