आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

मोहनलाल दोशी विद्यालयात जागतिक योगदिन उत्साहात संपन्न

मुख्याध्यापिका श्रीमती एस एम गोडबोले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले!

Kiran G.Patil M No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (21) अर्जुननगर

येथील मोहनलाल दोशी विद्यालयात जागतिक योगदिन उत्साहात संपन्न झाला. यावेळी मुख्याध्यापिका श्रीमती एस एम गोडबोले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. यावेळी श्रीमती गोडबोले यांनी सर्वांना योगदिनाच्या शुभेच्छा दिल्या

सुरवातीस क्रीडाशिक्षिका श्रीमती व्ही व्ही पाटील यांनी प्रस्तlविकातून योगाचे महत्त्व सांगितले व विद्यार्थ्यांकडून योगासनाचे प्रात्यक्षिक तसेच एरोबिक्स हालचाली करून घेतल्या. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ शिक्षक श्री आर एस भोसले शिक्षक प्रतिनिधी श्रीमती ए डी लकमले, श्री ए एच आळवे, कर्मचारी प्रतिनिधी श्रीमती एस आर भोपळे ,आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला सर्व शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.सूत्रसंचालन यु एम सातपुते यांनी केले.

कार्यक्रमाला जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री आशिषभाई शाह, उपाध्यक्षा श्रीमती प्रतिभा भाभी शाह, व डॉ.सौ तृप्ती शाह यांच्यासह सर्व संचालक पदाधिकाऱ्यांचे प्रोत्साहन लाभले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!