आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

युवा समिती अध्यक्ष लक्ष्मीकांत पाटील खासदार धैर्यशील माने यांच्या भेटीस!

खासदार पदी निवड झाल्या निमित्त केला सत्कार, सीमा प्रश्नावर सकारात्मक चर्चा!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (21)

सीमाप्रश्नामुळे कर्नाटक सीमाभागातील हजारो युवकांचे शैक्षणिकसह इतर बाजूने नुकसान होत आहे. आता हा प्रश्न अंतिम टप्प्यात आला असून लवकरच मराठी बांधवांच्या बाजूने निकाल लागेल. तोपर्यंत प्रत्येकांनी सनदशीर मार्गाने लढा दिला पाहिजे. सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी लवकरच बैठक घेऊ, अशी ग्वाही खासदार धैर्यशील माने यांनी दिली.

हातकणंगले लोकसभा मतदार संघातून निवडून आलेले शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांची निपाणीतील महाराष्ट्र एकीकरण युवा समिती अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन सत्कार केला. या वेळी ते बोलत होते. युवा म. ए. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार माने यांना बेळगाव सीमाप्रश्नावर लोकसभेत मुद्दा मांडून त्यावर सर्वमान्य तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारकडे तगादा लावण्या बद्दल विनंती केली.

शिवाय सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित असलेल्या खटल्याला चालना देण्यासाठी शासन पातळीवर जागृती निर्माण करून लक्ष वेधण्याबद्दल प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगितले.

यावेळी निपाणी येथील महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत पाटील, सुनील किरळे, तात्यासाहेब कांबळे, विक्रम शिंदे, गजानन पाटील, गणेश शिंदे, वैभव माने यांच्यासह युवा समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!