आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रशैक्षणिक

सौ.भा. शाह कन्याशाळेत कर्नाटकी बेंदूर सण उत्साहात संपन्न!

कार्यक्रमा प्रसंगी संस्थेच्या संचालिका डॉ. प्रविणा शाह उपस्थित होत्या!

Kiran G.Patil M.No.8884357516


दि फिमेल एज्युकेशन सोसायटी संचलित सौ भागिरथीबाई शाह कन्याशाळा व गर्ल्स मराठी कॉन्वेंट स्कूल शाळेत कर्नाटकी बेंदूर सण उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रम प्रसंगी संस्थेच्या संचालिका डॉ. प्रविणा शाह उपस्थित होत्या.

प्रारंभी शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका डॉ.सौ.एस जे.पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक भाषण केले. डॉ. प्रविणा शाह यांच्या हस्ते बैलजोडीचे पूजन करण्यात आले. त्या आपल्या भाषणात म्हणाल्या “भारत हा कृषीप्रधान देश आहे. शेतीची मशागत करण्यासाठी तसेच शेतीतील पिकांची कामे करण्यासाठी शेतकरी बैलांचा वापर करतो. शेतकरी बैलाकडून अनेक कष्टाची कामे करवून होतो. बैल हा शेतकऱ्याचा मित्र मानतात. बैलाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, हा सण साजरा करतात. शाळेत बैलजोडी आणून त्यांचे पूजन केल्यामुळे या सणाचे महत्व मुलींना समजले. शाळेत अनेक सांस्कृतिक व पारंपारिक सण साजरे केले जातात त्याबद्दल या उपक्रमाचे कौतुक केले!”

यावेळी सौ. ए. आर पाटील  व मुग्धा संकपाळ, प्रज्ञा रजपूत या विद्यार्थीनीनी आपल्या मनोगतातून बेंदूर सणाचे महत्व सांगितले. कार्यक्रमास यु की नागावे, एस.आर-इराज एम. एम. चिकोडे, जे.एम. शिंगे, जे.सी. चंद्रकुडे, जे. ए. कुरबेट्टी के. एस. भादले एस. डी. काळे यांच्या सह सर्व प्राथमिक व माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक/शिक्षिका विद्यार्थीनी उपस्थित होत्या. श्री. आर. पी. बामणे  यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व श्री. सी. एम. बाडकर यांनी आभार मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!