आपला जिल्हाक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

योगासनाने सकारात्मक विचार मनात येणे स्वाभाविकच – योगशिक्षक श्री बी. बी. परसनवर

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून निपाणीतील योगशिक्षक श्री बी. बी. परसनवर व श्री पी. व्ही पाटील होते!

Kiran G Patil M.No.8884357516


मराठा मंडळ बेळगाव संचलित मॉडर्न इंग्लिश स्कूल निपाणी येथे 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेच्या प्राचार्या सौ स्नेहा आर घाटगे यांनी भूषविले तर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून निपाणीतील योगशिक्षक श्री बी बी परसनवर व श्री पी व्ही पाटील ऑफिसर एच एल एल कणगला कंपनी हे उपस्थित होते. प्रमुख अतिथी श्री बी बी परसनवर  यांनी योगाचे वेगवेगळे प्रकार ,योगाचे महत्त्व आणि सूर्यनमस्कारातील बारा प्रकारांचे महत्त्व सांगून प्रात्यक्षिके करून दाखवून विद्यार्थ्यांच्या कडून करवुन घेतली.

श्री पी व्ही पाटील  यांनी दैनंदिन जीवनातील योगाचे महत्त्व आणि फायदे काय आहेत हे विद्यार्थ्यांना सांगितले. तसेच योगावर केलेली त्यांची कविता व मराठा मंडळ बेळगाव या संस्थेवर केलेली त्यांची कविता सादर करून दाखविली. तसेच योगाचे वेगळे प्रात्यक्षिके मुलांना करून दाखविली .

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सई चव्हाण व तेजस्विनी घोरपडे या विद्यार्थिनींनी तर पल्लवी गायकवाड या विद्यार्थिनीने पाहुण्यांचा परिचय करून दिला. मानसी कांबळे या विद्यार्थिनीने आभार प्रदर्शन  व्यक्त केले .या कार्यक्रमास मोठ्या संख्येने सर्व विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेच्या अध्यक्षा डॉ. राजश्री जी नागराजू  शाळेच्या प्राचार्या सौ स्नेहा आर घाटगे  शारीरिक शिक्षक एस डी पोवार व सुकुमार गोरवाडे  तसेच शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!