आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

सहकाररत्न रावसाहेब पाटील काळाच्या पडद्याआड!

सहकार क्षेत्रातील महामेरू हरपला!

Kiran G.Patil M.No.8884357516


दक्षिण भारत जैन सेभेचे अध्यक्ष सहकाररत्न रावसाहेब पाटील दादा काळाच्या पडद्याआड. सहकाररत्न अरिहंत उद्योग समुहाचे संस्थापक, अध्यक्ष दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष मा.श्री. रावसाहेब अण्णासाहेब पाटील (दादा) यांचे आज पहाटे निधन झाले. त्यांचे वय 83 वर्षे होते. त्यांच्या पार्थिवावर बोरगाव नगरीत जैन विधीनुसार अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. निपाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उत्तम पाटील व यशस्वी उद्योजक अभिनंदन पाटील यांचे ते वडील होत. रावसाहेब पाटील यांच्या सामाजिक कार्याचा वसा त्यांचे दोन्ही पुत्र यशस्वीरीत्या चालवत आहेत.

दुपारी २ वाजता बोरगाव शहरातील स्वगृही पार्थीव शरीर आणण्यात येईल. दुपारी 2.30 वाजता बोरगाव शहरातील प्रमुख मार्गाने अंत्ययात्रा काढण्यात येईल. 3 वाजता पार्थिवाचे अंतिम दर्शन व अंत्यसंस्कार करण्यात येतील. अंतिम दर्शन व अंत्यसंस्काराचे ठिकाण श्री अरिहंत मराठी माध्यमिक कॉन्व्हेंट स्कूल, बोरगाव-हुपरी रोड, बोरगाव येथे आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!