आपला जिल्हाक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रशैक्षणिक

स्वर्गीय आप्पासाहेब खराडे सर- पुरोगामी विचारातून हजारो विद्यार्थी घडविणारे अद्वितीय व्यक्तिमत्व

वडिलांच्या तिसऱ्यादिवशी सर्व धार्मिक विधी पूर्ण करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेऊन 125 वृक्षरोपे वाटप करणारे खराडे कुटुंबिय!

Kiran G.Patil M.No.8884357516


शिक्षण सेवा मंडळ निपाणी संचलित विद्यामंदिर निपाणी शाळेचे गणित शिक्षक आणि उत्कृष्ट कामगिरी करणारे माजी मुख्याध्यापक , निपाणी तालुक्यातील सर्व शिक्षकांचे गणित विषयाचे तज्ञ मार्गदर्शक, हजारो मुलांच्या जीवनातील दीपस्तंभ, स्वर्गीय आप्पासाहेब खराडे सरांचे वयाच्या 81व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.

खराडे सरांचा जन्म शिरगुप्पी या गावी झाला होता.निपाणीत वास्तव जरी असले तरी गावाशी तेवढाच संपर्क होता. विद्यामंदिर शाळेत गणिताचे शिक्षक म्हणून काम करत कुटुंबातील सर्वांना स्वतःच्या पायावर उभे करून गोरगरीब मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणुन त्यांचे भविष्य उज्ज्वल केले.आपल्या मृत्युनंतर तिसऱ्या दिवशी सर्व धार्मिक कार्य पूर्ण करावीत, लोकांना झाडे लावा झाडे जगवा हा संदेश द्यावा. बारा दिवस दुखवटा पाळून घरातील महिलांच्या डोळ्यात पाणी येऊ नये हा विचार आपला मुलगा अमित वं सुनबाई प्रतिभा यांना मृत्यु पूर्वी सांगितला होता.या क्रांतिकारी विचाराची अंमलबजावणी या दाम्पत्यांने आज केली.

याप्रसंगी माजी आमदार काकासाहेब पाटील मुकुंदराव देसाई, नामदेव चौगुले, सुधाकर सोनाळकर, आनंदा कुंभार यांनी श्रद्धांजली वाहून मनोगते व्यक्त केली. यावेळी  पी.टी. शाह, पी.एम.पाटील,आप्पासो सुगते,सचिन पाटील,चंद्रकांत मोरे,रवींद्र खोराटे, विकास नवाळे,राजू कराळे,सुरेश वागळे, गणपती राणमाळे, उमेश सुपले, विजय गायकवाड,ओंकार पेडणेकर, व सर्व खराडे परिवारातील सदस्य उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!