आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये पालक मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न!.

अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका स्नेहा आर घाटगे होत्या!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (29)

                बेळगाव मराठा मंडळ संचलित येथील मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये शिशु बालवाडी ते दहावी विद्यार्थ्यांचा सेतुबंध परीक्षा नंतर शाळा पूर्वतयारी पालक मेळावा पार पडला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका स्नेहा आर घाटगे होत्या.

                  मेळाव्यात विद्यार्थ्यांच्या समस्या, शाळेतील गृहपाठ, विद्यार्थ्यांची शिस्तबद्धता यासाठी पालक आणि शिक्षकांनी भूमिका कशी पार पाडावी या विषयावर चर्चा पार पडली.  स्नेहा घाटगे यांनी शाळेचे व्यवस्थापन त्याचबरोबर मुलांना कोणत्या प्रकारे शिस्त लावण्यामध्ये शिक्षक आणि पालकांची जबाबदारी असते याची भूमिका स्पष्ट केली. पालक मेळाव्यात श्रीमती के एस मेनसे यांनी प्रास्ताविक व पालकांचे स्वागत केले. तर शाळेचे नियम व अटी श्रीमती नीतू बुवा यांनी पालकांसमोर स्पष्ट केले. पाल्याचा पोषक व सकस आहार कसा असावा याची माहिती श्रीमती समीक्षा शिंदे यांनी दिली. शाळेचा गणवेश आणि शिस्तबद्धता याची माहिती क्रीडा शिक्षक श्री. सुकुमार गोरवाडे आणि श्रीमती पूजा पाटील यांनी दिली. त्याचबरोबर स्काऊट गाईड याची माहिती श्रीमती अर्चना जोरापुरे तर कब आणि बुलबुल याची माहिती श्रीमती धनश्री लोहार यांनी सांगितली.

               यावेळी मेळाव्यास पालक श्रीमती छाया सटाले, श्री.अविनाश माळगे, श्री.अभिजीत पाटील, श्रीमती तबसूम दावत, श्री.अमित हनमसागर व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!