आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

अंकुरम इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये पालक मेळाव्याचे आयोजन!

क्रीडो प्रतिनिधी सौ आश्लेषा दिवेकर यांनी पालकांना क्रीडो बद्दल माहिती दिली!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी.(29)

येथील अंकुरम इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आज शनिवार दिनांक 29 जून रोजी पूर्व प्राथमिक विभागातील पालकांसाठी मोठ्या प्रमाणात पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते

अंकुरम शाळेची पूर्व प्राथमिक विभागासाठी क्रीडो सोबत भागीदारी असून शाळेत या मुलांसाठी स्वतंत्र लॅबची सोय आहे. क्रियाकलाप माध्यमातून मुलांना शालेय अभ्यासक्रमात पारंगत करण्याचे शाळेचे धोरण असल्याने मुलांना प्रात्यक्षिकामार्फत शिक्षण दिले जाते. त्यामुळे मुलांची चौकस बुद्धी तयार होतेच शिवाय मुले शैक्षणिक अभ्यासक्रमात पारंगत होतात. अंकुरम इंग्लिश मीडियम स्कूल व क्रीडो टीम यांच्या समन्वयाने आजचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रीडो प्रतिनिधी सौ आश्लेषा दिवेकर यांनी पालकांना क्रीडो बद्दल माहिती दिली तसेच क्रियाकलाप शिक्षणाचे फायदे व काही प्रात्यक्षिके पालकांसमोर सादर केली. शाळेचे सेक्रेटरी डॉ. अमर चौगुले यांनी पालकांना मार्गदर्शन केले. पूर्व प्राथमिक हे पाल्याच्या जीवनातील पहिला शैक्षणिक टप्पा असल्याने तो अतिशय महत्त्वाचा आहे व ते योग्य रीतीने पार पाडला पाहिजे. बदलत्या काळानुसार शैक्षणिक पद्धतीत देखील बदल झाले पाहिजेत व ते अमलात आणले पाहिजेत असे डॉ. अमर चौगुले यांनी सांगितले शाळेच्या प्राचार्य सौ चेतना चौगुले यांनी पालकांना मुलांच्या जीवनातील शिस्त संस्कार याचे महत्त्व सांगितले. लहान वयातच मुलांची शारीरिक व मानसिक जडणघडण होणे गरजेचे असल्याने त्यांनी सुचवले

या कार्यक्रमास पालकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका सौ शिल्पा तारळे यांनी केले तर सौ हर्षदा पुरंदरे यांनी उपस्थितांचे आभार मानले यावेळी शाळेचा संपूर्ण शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी व पालक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!