आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

निपाणी मध्ये “डॉक्टर्स डे” उत्साहात संपन्न!

आय एम ई हॉलमध्ये कार्यक्रमाचे नियोजन!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी व परिसरामध्ये काल डॉक्टर्स डे निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन, निपाणी आय.एम.ई हॉलमध्ये निपाणी व परिसरातील सर्व वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स एकत्र येऊन डॉक्टर्स डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी डॉ. बसवराज कऱ्यापगोळ म्हणाले की डॉ. बी. सी. रॉय म्हणून ओळखले जाणारे बिधन चंद्र रॉय (बंगालीः 1 जुलै 1882 – 1 जुलै 1962) हे एक निष्णात डॉक्टर होते. ते भारताच्या  पश्चिम बंगाल राज्याचे दुसरे मुख्यमंत्री होते. बी.सी. रॉय एक आघाडीचे स्वातंत्र्यसेनानी व महात्मा गांधीचे निकटवर्ती सहकारी होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी गांधींजीच्या सांगण्यावरून राजकारणामध्ये प्रवेश केला व 1948 साली पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. ह्या पदावर ते पुढील 14 वर्षे होते. 1961 साली भारत सरकारने त्यांना भारतरत्न पुरस्कार देऊन गौरवले. 1 जुलै 1962 रोजी त्यांच्या जन्मदिनी रॉय ह्यांचे निधन झाले.

वैद्यकीय शास्त्रात केलेल्या नावीन्यपूर्ण संशोधनासाठी डॉ. बी.सी. रोय यांच्या नावाचा एक पुरस्कार दरवर्षी दिला जातो. 2016 सालचा हा पुरस्कार मूत्रविकारतज्ज्ञ डॉ. संजय कुलकर्णी यांना जाहीर झाला आहे. इ.स. 1976 सालापासून दिला जात असलेला हा वार्षिक पुरस्कार यापूर्वी भारतातील पहिली लेलहश्रशरी काश्रिरपींची शस्त्रक्रिया करणारे मिलिद वसंत कीर्तने यांना 2014 साली मिळाला आहे. त्यानंतर मराठी माणसाला पुरस्कार मिळायची ही दुसरी वेळ आहे.

या कार्यक्रमास आय एम ई.चे चेअरमन डॉ. बसवराज कऱ्यापगोळ, सेक्रेटरी डॉ.अभिषेक माने, डॉ.सी.बी. कुरबेट्टी, डॉ.अनिल सनगर, डॉ.सुनिल ससे, डॉ. अरुण पाटील, डॉ. देवर्षी, डॉ. पवन ऋतूनावर, डॉ. अमित होगाडे डॉ. पी वाय कुलकर्णी, डॉ. एस एस कुरबेट्टी, डॉ नितीन शहा डॉ. प्रमोद शहा डॉ. सुनिता देवर्षी डॉ. मीना ससे डॉ. उषा शहा डॉ .विना कऱ्यापगोळ, डॉ. दीपा पाटील, डॉ. विनायक माने, डॉ. ज्योतिबा चौगुले, डॉ विजय पाटील यांच्यासह मोठ्या प्रमाणात वैद्यक क्षेत्रातील तज्ञ उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!