आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

शिरगुपीतील शेतकऱ्यांचा निपाणी हेस्कॉमवर विराट मोर्चा!

महिला शेतकऱ्यांनी कार्यालयातील लाईट बंद करून केला निषेध!

Kiran G.Patil M.No.8884357516


मान्सूनच्या लहरी वातावरणाणे पहिलाच मेटाकुटीला आलेल्या शेतकरी राजाला हेस्कॉमच्या अनियमित विद्युत पुरवठ्याने हैराण केल्यामुळे काल शिरगुपी व डोंगर भागातील नऊ गावातील शेकडो महिला व पुरुष शेतकऱ्यांनी निपाणी हेस्कॉम कार्यालयावर विराट मोर्चा काढला.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार मागील दोन ते अडीच महिन्यापूर्वी झालेल्या वादळी वाऱ्याच्या पावसामुळे विस्कळीत झालेली हेस्कॉमची घडी तीन महिने होत आले तरी अजून देखील रुळावर आलेली नसून डोंगर पायथ्यावरील या गावांमध्ये दिवसातून कमीत कमी 15 ते 20 वेळा लाईट ये जा करत असते. ती सिंगल फेज, थ्री फेजचा तर या भागामध्ये पत्ताच नाही. या सर्व गोष्टींचा कडेलोट झाल्यामुळे काल शिरगुपीतील महिला व शेतकरी ग्रामस्थांनी निपाणी  काम हेस्कॉम कार्यालयावर विराट मोर्चा काढून कार्यालयातील काही वेळ लाईट बंद करून आपला निषेध नोंदवला.

निपाणी हेस्कॉम अभियंता अक्षय चौगुले यांच्यासमोर महिलांनी आपली भूमिका मांडताना सांगितले की तुम्ही 24 तास एसी मध्ये बसत असता. त्यामुळे तुमची मुले देखील चांगल्या ठिकाणी राहत असतात, इंग्लिश मीडियम शाळेत पाठवून तुम्ही निवांत आहात, पण आम्हा शेतकऱ्यांच्या मुलांनी शिकायचं का नाही.? की लाईट नसल्यामुळे रात्रीच्या वेळी साप, मुंगस, किडा मुंगीच्या दहशती खालीच जगायचं का? असा खडा सवाल उपस्थित करत अभियंतांना निरुत्तर केले. अनेक शेतकरी राजांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना आपला कारभार भोंगळ असून लवकरात लवकर आम्हास शेतीसाठी 12 तास व घरगुती वापरासाठी 24 तास लाईट मिळत नाही तोपर्यंत हे मोर्चे आपल्या कार्यालयावर निघतच राहणार त्यामुळे लवकरात लवकर तोडगा काढून आम्हास न्याय देण्याचे निवेदन काल सर्व शेतकऱ्यांच्या हस्ते देण्यात आले.

यावेळी शिरगुपी पांगीर, बुदलमुख शेंडुर, गोदुकुपी, तवंदी,गवाण, अमलझरी,यरनाळ  या भागातील अनेक पुरुष व महिला शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते.


लेखी आश्वासन द्या अन्यथा जाणार नाही..

Table of Contents

काल शिरगुपीतील महिला शेतकरी इतक्या आक्रमक झाल्या होत्या की त्यांनी कार्यालयातील लाइट्स काही काळ बंद करून त्यांना उष्णतेची झळ पोचवण्याचा प्रयत्न केला. व शेवटी कार्यालय अभियंत्यांना जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत कार्यालयातील ठिय्या उठवणार असल्याचा सज्जड दम दिला.

सहा जुलै पर्यंत योग्य तो तोडगा काढू- कार्यालय अभियंता अक्षय चौगुले….

निवेदनास उत्तर देताना चौगुले म्हणाले की हा प्रश्न अनेक गावांमध्ये असून शिरगुपी येथील शेतकऱ्यांनी अनेक समस्यांना सामोरे जात आम्हाला सहकार्य केले असून इथून पुढे देखील सहकार्याची अपेक्षा आहे. तसेच आपण दिलेल्या निवेदनाचा मी सारासार विचार करून लवकरात लवकर वरील मागण्यांचे आश्वासन पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. व आपल्या गावातील असणाऱ्या वायरमनच्या तक्रारीचा लवकरात लवकर छडा लावून योग्य ते कारवाई करण्याचे देखील आश्वासन दिले.

शिरगुपीचा वायरमन वादाच्या भोवऱ्यात…

हेस्कॉम कार्यालय कडून प्रत्येक ग्रामपंचायतीला एक वायरमन नेमून दिलेला असतो. पण शिरगुपी ग्रामपंचायत साठी दिलेला वायरमन केव्हाही हजर नसतो. प्रत्येक लाईट जोडणीला पैशाची मागणी करत असतो, अरे रावीची उत्तर देत असतो, फोन केव्हाही चालू नसतो, अनेक लोकांच्या संगनमताने टी सी मधील ऑइल गायब करतात, या व अशा अनेक आरोपांच्या फैरी कार्यालय अभियंत्यांच्या समोर शेतकऱ्यांनी मांडल्यामुळे शिरगुपीतील वायरमन वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!