आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये “डॉक्टर्स डे” उत्साहात साजरा!

प्रमुख पाहुणे नेत्रतज्ञ डॉ. सदानंद एम. पाटणे तर अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका स्नेहा आर. घाटगे होत्या

Kiran G.Patil M.No.8884357516


बेळगाव मराठा मंडळ संचलित येथील मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये डॉक्टर्स डे नुकताच साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे नेत्रतज्ञ डॉ. सदानंद एम. पाटणे तर अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका स्नेहा आर. घाटगे होत्या.

प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले डॉ. सदानंद पाटणे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना मुलांनी मोठी स्वप्ने पहावीत आणि मोठे स्वप्न साकार करत असताना आपले आरोग्य कसे सुदृढ ठेवावे हे देखील समजावून सांगितले आणि आजच्या युवा पिढीमध्ये मोबाईलच्या अतिवापरामुळे होणाऱ्या मायोपिया या दृष्टी रोगाबद्दल माहिती दिली तसेच विद्यार्थ्यांनी फास्ट फूड आणि जंक फूड खाणे टाळले पाहिजे. पोषक आणि सकस आहाराचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. त्याचबरोबर अध्यक्षस्थानी असलेल्या मुख्याध्यापिका श्रीमती स्नेहा आर घाटगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की मुलांनी मोबाईलचा अतिवापर टाळून नवनवीन कला कौशल्ये आत्मसात करावीत. मुख्याध्यापिका डॉक्टरांचे विशेष आभार मानताना आपल्या व्यस्त वेळापत्रकातून आमच्या शाळेला भेट दिल्याबद्दल डॉक्टर पाटणे यांना धन्यवाद दिले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कु.स्वरा जाधव आणि कु.सिमरा जमादार यांनी केले. आठवी आणि नववीच्या विद्यार्थिनीनी स्वागत गीत प्रस्तुत केले. तर कु. पूर्वा चव्हाण, कुमारी दिशा मोकाशी, कु. कीर्ती पाटील, कु. दिव्या पाटील कु. सौम्या करगुपी यांनी भाषणे दिली. तर आभार प्रदर्शन कु. पूर्वा चव्हाण यांनी केले. कार्यक्रमास विज्ञान शिक्षिका श्रीमती पि. यू. वागळे, श्रीमती स्मिता पवार आणि धनश्री लोहार उपस्थित होत्या.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!