आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक
चिकोडीचे उद्योजक- श्री.राजू पवार आणि सौ.मानसी पवार या दाम्पत्यांनी दिली मराठा मंडळ हायस्कूलला भेट!
मुख्याध्यापक डी डी हळवणकर यांनी श्री आणि सौ.पवार कुटुंबियांचे मनःपूर्वक आभार मानले!
निपाणी मराठा मंडळ संचलित, निपाणी मराठा मंडळ हायस्कूल निपाणी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांच्यासाठी आज 3 जुलै 2024 रोजी चिकोडीचे उद्योजक- श्री.राजू पवार आणि सौ.मानसी राजू पवार या दाम्पत्यांनी मराठा मंडळ हायस्कूला भेट दिली.
या भेटी दरम्यान न जरा इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या सोबत संवाद साधला. शैक्षणिक वर्ष 2024-25 या वर्षासाठी सौ.मानसी राजू पवार यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या तसेच भावी आयुष्यामध्ये त्यांनी चांगली नोकरी व्यवसाय करावा असे मार्गदर्शन केले. तसेच हायस्कूलसाठी वह्या विद्यार्थ्यांच्यासाठी मुख्याध्यापकांच्याकडे सुपूर्द केल्या.
निपाणी मराठा मंडळ मुख्याध्यापक डी डी हळवणकर यांनी श्री आणि सौ.पवार कुटुंबियांचे मनःपूर्वक आभार मानले.