आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

ज्ञानसाधनेचे व्रत ए.डी. पवारांनी अखंडपणे जोपासले – प्रशांत गुंडे!

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉलेजच्या प्राचार्या प्रा.डॉ.जी.डी. इंगळे होत्या!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (2)

ज्ञानदान हे खरोखरच महान दान आहे ते आपल्या अध्यापनाच्या सेवेतून अखंडपणे ए.डी.पवारांनी केले असे मत जनता शिक्षण मंडळाचे सदस्य प्रशांत गुंडे यांनी व्यक्त केले. ते देवचंद कॉलेज चे कनिष्ट विभागाचे उपप्राचार्य ए.डी. पवार यांच्या सेवानिवृत्ती सत्कार प्रसंगी बोलत होते. अध्यक्ष स्थानी कॉलेजच्या प्राचार्या प्रा.डॉ. जी. डी.इंगळे होत्या

ते पुढे म्हणाले ए.डी. पवारांनी अध्यापना बरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने त्यांनी स्वतः आत्मसात केलेले विविध पैलू विद्यार्थ्यांच्या मध्ये रुजविले.

अध्यक्षीय भाषणात बोलताना प्राचार्या प्रा.डॉ. जी. डी. इंगळे म्हणाल्या उपप्राचार्य ए.डी.पवार हे शांत, संयमी वृत्ती, नम्र स्वभाव, विविध घटकांशी त्यांचे असलेले स्नेहाचे संबंध मार्गदर्शनाच्या अनुषंगाने उत्तम प्रेरणा देण्याची भावना, विद्यार्थ्यांशी, सहका-याशी, जिवलग मित्रांशी किंबहुना समाजातील सर्वच घटकांशी आपुलकीचे, जिव्हाळ्याचे स्नेहपूर्ण संबंध इ. मुळे ए.डी.पवार सर्वांचेच आदराचे स्थान बनलेले आहेत.

सत्कारास उत्तर देताना उपप्राचार्य ए.डी. पवार म्हणाले प्राध्यापक ते उपप्राचार्य पदापर्यंत संस्थेने दिलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडली संस्थेचे माजी अध्यक्ष स्वर्गीय श्रीमान किरणभाई शाह तसेच अध्यक्ष श्रीमान आशिषभाई शाह, उपाध्यक्षा डॉ. सौ. तृप्तीभाभी शाह व खजिनदार सुबोधभाई शाह यांनी माझ्यावर टाकलेला विश्वास कामातून सार्थ करून दाखविला. त्यांचे माझ्यावर अनंत उपकार कायम राहिले माझ्या संपूर्ण शैक्षणिक कार्यात माझे सहकारी म्हणून राहिलेले सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, तसेच विद्यार्थी, मित्रपरिवार माझे कुटुंबीय यांचे मला कायम सहकार्य मिळाले याबद्दल मी या सर्वांचा ऋणी आहे.

या सत्कार समारंभात पर्यवेक्षिका प्रा.एस.पी.जाधव  पर्यवेक्षक डॉ. ए.एन. डोनर, प्रा.डॉ सविता धोंगडे-देसाई, प्रा. यु.आर. पाटील, प्रा. एस. एस. खोत, यांनी ए.डी. पवार बद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.

यावेळी संस्थेच्या वतीने त्यांना शाल, श्रीफळ, व मानपत्र देवून सन्मान करण्यात आला त्याचबरोबर जनता शिक्षण कर्मचारी पतसंस्था, रसायनशास्त्र विभाग व इतर मित्र परिवारांच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

यावेळी संस्थेचे प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मित्रपरिवार तसेच स्टाफ वेलफेअर चे सदस्य मोठ्या संखेने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे स्वागत, प्रास्ताविक, मानपत्राचे वाचन व आभार प्रा.ए.एन. नदाफ यांनी केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!