आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

राहुल गांधी यांनी हिंदु धर्मियांसंदर्भात केलेल्या वक्तव्याविषयी त्यांची खासदारकी रहित करा!

समस्त हिंदू बांधवांनी दिले निपाणी तहसीलदारांना निवेदन!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (5)

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी हिंदूंना हिंसक, खोटारडे आणि द्वेषपूर्ण असे संबोधल्याने हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. तरी राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व तात्काळ रहित करून त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निपाणी तहसीलदारांना  देण्यात आले. राष्ट्रपतींच्या नावे असलेले हे निवेदन उप तहसीलदार श्री मृत्युंजय डंगी यांनी स्वीकारले. या प्रसंगी निपाणीतील धर्मप्रेमी डॉ.श्री चंद्रशेखर खोत, श्री रविंद्र खोत, श्री उत्तम मोहिते, रोहन राऊत, अभिनंदन भोसले स्वप्नील पोतदार, जे.डी.शिंदे, राजु हिंग्लजे, गणेश जाधव, चारुदत्त पावले, अमोल चेंडके,अजित पारळे, रविंद्र महादेव शिंदे, राजेश आवटे, बाबुराव महाजन महाराज, जुगलकिशोर वैष्णव सुनील वाडकर, प्रशांत घोडके,नामदेव मुसळे,अनिल परीट,पवन हत्रोटे, संतोष मोरे यांसह मोठ्या प्रमाणात ग्रामीण व शहरी भागातून धर्मप्रेमी उपस्थित होते.

राष्ट्रपतींच्या नावे असलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राहुल गांधी यांनी हिंदू समाजाची सार्वजनिक आणि बिनशर्त क्षमायाचना करावी. राहुल गांधी यांनी वा त्याच्या काँग्रेस पक्षाने पहिल्यांदा असे वक्तव्य केले आहे असे नाही. तर यापूर्वी काँग्रेसने भगवा दहशतवाद किंवा हिंदू दहशतवाद संकल्पना मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

वर्ष १९९० च्या दशकात काश्मीरी हिंदूंना काश्मीरमधून कोणी विस्थापित केले ? कोणत्या समाजाने हे विस्थापन केले हे राहुल गांधी सांगतील का ? ‘सर तन से जुदा’चा फतवा काढून देशभर अनेक हिंदूंचे गळे कापणारे कोण होते, हे राहूल गांधी सांगतील का ? संपूर्ण विश्‍व जिहादी आतंकवादाने त्रस्त आहे, लाखो लोक मारले गेले आहेत, पण या दहशतवादाचा रंग कोणता ? हे राहूल गांधींनी कधी सांगितलेले नाही. सर्वांत प्राचीन असलेला हिंदु धर्म हा सहिष्णु असल्यामुळे त्याने अन्य पंथीयां प्रमाणे कधी साम्राज्य विस्तारासाठी अथवा धर्मपरिवर्तनासाठी इतरांवर आक्रमण केले नाही.

हिंदु धर्म हा “वसुधैव कुटुंबकम” अर्थात संपूर्ण जग एक कुटुंब या तत्त्वाचे प्रतिनिधित्व करतो. या समाजाला हिंसक, खोटारडा, द्वेष्टा किंवा दहशतवादी म्हणून लेबल लावून त्याची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न सुरू आहे. लोकसभेत ‘लोकसभा सदस्यत्वा’ची शपथ घेतांना सर्वांशी समभावाने वागण्याची जी शपथ घेतली जाते. त्या शपथेचा राहूल गांधी यांनी उडपपणे भंग केला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांचे लोकसभेचे सदस्यत्व तात्काळ रद्द करण्यात यावे. आणि समाजात भेद, द्वेष निर्माण करणार्‍यांना अशा लोकांना निवडणूक लढवण्यासाठी कायमस्वरूपी बंदी घातली पाहिजे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!