आपला जिल्हाकृषीक्रीडाताज्या घडामोडीदेश विदेशनिपाणी परिसरमहाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

ग्रामदैवत वैभव संपन्न श्री महालक्ष्मी मंदिराची वास्तूशांत, कळसारोहन समारंभ आणि नूतन महालक्ष्मी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा लवकरच- अध्यक्ष आशिषभाई शाह!

प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज साकारणार श्री. महालक्ष्मीची आकर्षक मूर्ती!

Kiran G.Patil M.No.8884357516


निपाणी नगरी प्रतिनिधी (8)

निपाणीचे ग्रामदैवत वैभव संपन्न श्री महालक्ष्मी मंदिराची वास्तुशांत कळसारोहन समारंभ आणि नूतन श्री महालक्ष्मी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा लवकरच होणार असून हा निपाणीच्या इतिहासामध्ये एक आगळावेगळा सोहळा ठरणार असून. महालक्ष्मी मूर्तीचे शिल्प अयोध्येतील रामलल्लाची मूर्ती बनवणारे शिल्पकार अरुण योगीराज हे तयार करणार असून तयार होणारी मूर्ती रेखीव व आकर्षक होणारा असून ही सर्व निपाणीकरांसाठी अभिमानाची गोष्ट असेल असे मत निपाणी श्री महालक्ष्मी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष व उद्योजक श्री आशिषभाई शाह यांनी व्यक्त केले.

ते आज आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषदेला संबोधित करताना बोलत होते. ते पुढे म्हणाले श्री महालक्ष्मी मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा निपाणी करांसाठी एक पर्वणी असून प्रत्यक्ष मूर्ती कृष्णशिळा पाषाणामध्ये तयार होणार असून श्री महालक्ष्मीची मूर्ती सिंहासनारूढ अवस्थेत साडेचार फुटी उंचीची असेल, प्रत्यक्ष शिल्पाचे काम लवकर चालू होणार असून अयोध्येतील मूर्तीचे प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज ही मूर्ती साकारत असून या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आपण सज्ज राहण्याचे आवाहन देखील अध्यक्षांनी पुढे केले. 

यावेळी उपाध्यक्ष प्रशांत गुंडे म्हणाले सध्या बाहेरील बाजूस असलेले जुने पुरातन मंदिर व त्या मंदिरातील मूर्तीचे भविष्यात योग्य ते नियोजन केले जाईल. आता बांधलेले श्री महालक्ष्मी मंदिर सर्व सोयींनी युक्त असून आतापर्यंत एक कोटी चाळीस लाखापेक्षा अधिक खर्च झाला असून लवकरच सुसज्ज असे मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले होणार आहे. शिल्पकार योगीराज यांच्या म्हैसूर येथील भेटीदरम्यान त्यांना मूर्तीचे स्वरूप सांगितले आहे. मंदिरात आधी जशी देवीची मूर्ती होती तशीच हुबेहूब मूर्ती साकारण्याची त्यांनी ग्वाही दिली आहे.

या पत्रकार परिषदेस तृप्तीभाभी शाह, सुधाकर खोडबोले, अभिजीत मुदकुडे, जयराम मिरजकर, दीपक वळीवडे, दयानंद साजन्नावर, किरण परिट, यांच्यासह श्री महालक्ष्मी मंदिर समितीचे अनेक सदस्य उपस्थित होते. मंडळाचे सेक्रेटरी श्री अमोल औंधकर यांनी उपस्थितांचे स्वागत प्रास्ताविक व आभार मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!